एक मुलाच्या बापानं केलं भयंकर कांड! दुसऱ्या महिलेशी केलं लफडं..पहिल्या पत्नीचा खून करून मृतदेह नदी किनारी पुरला, अन् नंतर घडलं..

Husband Killed Wife Viral News :  बिहारच्या बांका जिल्ह्यात कौंटुबिक वादविवादातून धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाद इतका विकोपाला गेला की, पतीने दुसऱ्या पत्नीसोबत मिळून पहिल्या पत्नीची हत्या केली.

ADVERTISEMENT

'पालकांच्या विरोधामुळे लग्नाचे वचन मोडल्याने संमतीने झालेले लैंगिक संबंध बलात्कारात बदलणार नाहीत'
Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केले गंभीर आरोप

point

आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी

point

आर्थिक संटकामुळे टेन्शन वाढलं होतं

Husband Killed Wife Viral News :  बिहारच्या बांका जिल्ह्यात कौंटुबिक वादविवादातून धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाद इतका विकोपाला गेला की, पतीने दुसऱ्या पत्नीसोबत मिळून पहिल्या पत्नीची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. सावित्री देवी (34) असं मृत महिलेचं नाव आहे. 
 
ही धक्कादायक घटना मामला जिल्ह्यातील आनंदपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमजोरा गावात घडली. या गावात बुधवारी एका घरात कौंटुबिक वादविवाद इतका वाढला की, पतीने दुसऱ्या पत्नीसोबत मिळून पहिल्या पत्नीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह नदी किनारी पुरला आणि आरोपी तिथून फरार झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीची दुसरी पत्नी पूजा देवीला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपी पती अजूनही फरार आहे. 

मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केले गंभीर आरोप

मृत महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला की, जाऊ घरी आल्यापासून सावित्री देवीला खूप त्रास सहन करावा लागत होता. काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये खूप वाद होत होता. तिच्या पतीने तिच्यासोबतचं नातं तोडलं होतं. त्या महिलेचा पती तिहा मारहाणही करायचा. बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झालं आणि पतीनं दुसऱ्या पत्नीसोबत मिळून सावित्रीचा खून केला आणि तिचा मृतदेह नदी किनारी पुरला.

हे ही वाचा >> अरुण गवळी मिल कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन.. दाऊदला नडणाऱ्या 'डॅडी'ची खतरनाक कहाणी

आर्थिक संटकामुळे टेन्शन वाढलं होतं

मृत महिलेवर आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यामुळे ती मजुरी करायची. तिला एक मुलगाही आहे. ब्रम्हदेव असं त्याचं नाव आहे. या घटनेबाबत माहिती मिळाल्यावर मृत महिलेचे माहेरचे लोक घरी पोहोचले. मृताच्या कुटुंबियांनी म्हटलंय की, पूजा देवी आल्यानंतर पती सवित्री देवीची काळजी घेत नव्हता. तो तिचा छळ करायचा. 

आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी

हत्येची खबर मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी आरोपी पती आणि त्याच्या पत्नीविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, हे फक्त हत्येचं प्रकरण नाही. तर एका महिलेचा खूप दिवसांपासून छळही करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

हे ही वाचा >> तरुणीचं नुकतंच झालं होतं लग्न, कॉलेजला जाऊन येते असं म्हणाली अन् बॉयफ्रेंडसोबत गेली पळून, शोध घेताच फोनवर...

हे वाचलं का?

    follow whatsapp