कोल्हापूर हादरलं! मित्रांचं सुरु होतं संभाषण, अचानक बोलणंच खटकलं, नंतर धारदार शस्त्राने मित्राचाच गळा चिरला अन् ...

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात हादरून टाकणारं प्रकरण आता समोर आलं आहे. एका किरकोळा वादातून एका वृद्ध व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

kolhapur crime
kolhapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर जिल्ह्यात हादरून टाकणारं प्रकरण

point

किरकोळा वादातून वृद्धाने मित्राचीच केली हत्या

point

नेमकं काय घडलं?

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात हादरून टाकणारं प्रकरण आता समोर आलं आहे. एका किरकोळा वादातून एका वृद्ध व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. ही घटना कोल्हापूरातील हनुमाननगर भागातील आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मोहन सूर्यकांत पवार (वय 70) असून त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation: OBC नाराज, मराठा आरक्षण देऊन भाजप चक्रव्यूहात अडकलं? CM फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल सुरू!

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, मृत्यू झालेल्या मोहन पोवार आणि आरोपी चंद्रकांत केदारी शेळके (वय 73) यांच्यात संभाषणादरम्यान वाद झाला होता. तोच वाद हत्येचं किरकोळ कारण ठरलं आहे. यादरम्यान, मोहनने चंद्रकांतच्या आईला शिवीगाळही केली होती. यामुळे चंद्रकांतने धारदर शस्त्राने सपासप वार करत मोहनचं मुंडकं छाटलं होतं.

पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला लावली आग

खून करण्यात आलेल्या आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला आग लावली होती. परंतु घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी पेटलेलं घर आणि धुराचे लोट पाहता तात्काळ पोलिसांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आग विझवण्याचे काम केले आणि तपास सुरू केला. जुना राजवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेनं तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी संशयित आरोपी चंद्रकांत शेळकेला बेड्या ठोकल्या आहेत.

हे ही वाचा : उद्या 7 सप्टेंबर रोजी ग्रहण योगाचं सावट, काही राशीतील लोकांवर धोक्याची टांगती तलवार, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र

हा खून रागाच्याभरात जरी करण्यात आला असला तरीही, नेमकं ठोस कारण सोर आलं नाही. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp