तीन मेहुण्यांनी मिळून दाजीचे हात-पाय बांधले अन् कारच्या डिक्कीत... फिल्मी स्टाइलने केलं किडनॅप पण...

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे तीन मेव्हण्यांनी मिळून अगदी फिल्मी स्टाइलने दाजीचं अपहरण केलं. आरोपींनी आधी पीडित दाजीचे हात-पाय दोरीने बांधले, तोंडाला कापड बांधलं आणि त्याला कारच्या डिक्कीत टाकलं.

ADVERTISEMENT

तीन मेहुण्यांनी मिळून दाजीचे हात-पाय बांधले अन् कारच्या डिक्कीत...
तीन मेहुण्यांनी मिळून दाजीचे हात-पाय बांधले अन् कारच्या डिक्कीत...( फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीन मेहुण्यांनी मिळून दाजीला फिल्मी स्टाइलने केलं किडनॅप

point

नंतर पोलिसांनी पकडलं अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक चकित करणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे तीन मेव्हण्यांनी मिळून अगदी फिल्मी स्टाइलने दाजीचं अपहरण केलं. आरोपींनी आधी पीडित दाजीचे हात-पाय दोरीने बांधले, तोंडाला कापड बांधलं आणि त्याला कारच्या डिक्कीत टाकलं. त्यानंतर, आरोपी मेहुण्याला कुठेतरी घेऊन जाऊ लागले. पण पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाली. मग पोलिसांनी गाडी रोखली आणि पीडित तरुणाला डिक्कीतून सुरक्षितपणे बाहेर काढलं.

त्यानंतर मेहुण्यांनी पोलिसांना सांगितलं की "आमचा दाजी बहिणीला सतत मारहाण करायचा आणि म्हणून आम्ही त्याला गाडीत टाकून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येत होतो." सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हे प्रकरण खंडौलीतील खेरिया गावातील आहे. बहिणीला तिच्या नवऱ्याने मारहाण केल्यामुळे तिच्या भावांना राग आला आणि त्यामुळे त्यांनी दाजीचं अपहरण केलं.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिसरात कारवाईचे आदेश दिले आणि वाटेतील वाहनांची तपासणी करत असताना त्यांनी आग्रा-हथरस रस्त्यावरील पडरांव गावाजवळ एक गाडी रोखली. पोलिसांनी गाडीची डिक्की उघडली असता तिथे असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला आणि हे भांडण मारहाणीपर्यंत पोहचलं. यादरम्यान, यादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांसोबत देखील झटापट झाली. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दाजीला सुखरूप बाहेर काढलं. 

हे ही वाचा: 2 वर्षांच्या बाळाला 13 व्या मजल्यावरून फेकलं अन् नंतर आईने सुद्धा मारली उडी...

नेमकी घटना काय? 

खेरिया गावाचा रहिवासी असलेल्या हरदेव सिंगने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की 25 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न हाथरसमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीसोबत झालं. पत्नीच्या माहेरच्या लोकांचा आपल्या जमिनीवर डोळा असल्याचा हरदेवने आरोप केला. याच कारणामुळे घरात सतत वाद व्हायचे. हरदेवने सांगितल्याप्रमाणे, बुधवारी (3 सप्टेंबर) त्याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. नंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करत असताना त्याचे मेहुणे राजपाल, सत्यपाल आणि धर्मवारी यांच्यासह पाच जण हरदेवच्या घरी गेले. आरोपींनी हरदेवला पकडून त्याचे हात-पाय बांधले आणि तोंडाला कापड बांधून त्याला कारच्या डिक्कीत टाकलं. 

हे ही वाचा: जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य! नंतर अश्लील व्हिडीओ सुद्धा...

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता राजपालने सांगितलं की त्याच्या दाजीने बहिणीला गंभीर पद्धतीने मारहाण केली होती. बुधवारी तिला तिच्या पतीने केलेल्या मारहाणीमुळे बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हरदेवला पोलिसांकडे नेत असताना त्यांच्यामध्ये वाद झाल्याचा दावा आरोपीने केला. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरदेवला डिक्कीत बंद केल्याचं दिसत आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील पती आणि पत्नीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. हरदेवच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp