जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य! नंतर अश्लील व्हिडीओ सुद्धा...

ग्रेटर नोएडामध्ये जावयाने आपल्या विधवा सासूला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य!
जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जावयाने विधवा सासूवर केला लैंगिक अत्याचार

point

हॉटेलमध्ये नेलं अन् अश्लील व्हिडीओ सुद्धा...

Crime News: ग्रेटर नोएडामध्ये नातेसंबंधाला काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. जावयाने आपल्या विधवा सासूला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, आरोपीने तिच्या सासूचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने आरोपी जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. 

कोल्ड्रिंग पाजलं अन् लैंगिक अत्याचार...

पीडितेच्या तक्रारीनुसार, रबूपुरा येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेने तिच्या जावयावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या मते, तिच्या जावयाने तिला मादक पदार्थ मिसळलेलं कोल्ड्रिंक पाजलं आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  पती-पत्नी बाजारात गेले होते..घरी परतल्यावर सर्वांशी गप्पाही मारल्या, पण काही तासानंतर रुममध्ये आढळला दोघांचा मृतदेह!

पीडितेने केला विरोध 

पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये संबंधित महिलेनं तिच्या मुलीचं लग्न ककौड येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत लावून दिलं होतं. आरोपी तरुण हा सैन्यात नोकरी करत असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात एके दिवशी पीडिता तिच्या जावयासोबत कारमधून दिल्लीला जात होती. त्यावेळी आरोपी जावयाने वाटेतच तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये एका खोलीत राहण्याचं ठरवलं. त्यावेळी हॉटेलमध्ये आरोपीने तिच्या सासूला कोल्ड्रिंक प्यायला दिलं आणि ते प्यायल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. त्यावेळी बेशुद्ध असलेल्या अवस्थेत पीडितेच्या जावयाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेला शुद्ध आल्यानंतर तिने तिच्या जावयाच्या अशा कृत्याला विरोध केला असता आरोपीने तिचा अश्लील व्हिडीओ दाखवून तिला गप्प राहण्याची धमकी दिली. आरोपीच्या भितीमुळे पीडित महिलेने याबद्दल कोणालाही सांगितलं नाही.

हे ही वाचा:  'इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी...', तब्बल 10 वर्षानंतर शीना बोरा हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा!

बऱ्याचदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले 

याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्या सासूसोबत बऱ्याचदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि पीडितेच्या मालमत्तेचे कागदपत्रे सुद्धा घेतले. मात्र, मुलीचं घर वाचवण्यासाठी पीडित सगळं काही सहन करत राहिली. इतकेच नव्हे, तर महिलेने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आता पीडितेची मुलगी आणि जावयामध्ये वाद होत असल्याचं समोर येत आहे. सध्या, प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp