Maratha Reservation: एक नाही तर 2 जीआर निघाले ते पण तासाभरात, छगन भुजबळांचे 'मुंबई Tak चावडी'वर गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal: मुंबई Tak चावडी या विशेष कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी जे दोन जीआर काढण्यात आले त्याबाबत संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना मराठा आरक्षणाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी जीआर काढण्यात आले त्याविषयी देखील त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी छगन भुजबळांनी असाही संताप व्यक्त केला की, मनोज जरांगेंसमोर समिती तासभर बसून होती कारण पहिल्या जीआरमधील पात्र शब्द त्यांना वगळण्यास सांगण्यात आला. त्यामुळे तासाभरात दुसरा जीआर काढण्यात आला. पाहा याबाबत छगन भुजबळांनी नेमका काय गौप्यस्फोट केला.
मराठा आरक्षणाच्या 2 जीआरबाबत छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
'मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून सांगितलं की, येऊन जा.. मला कल्पना होती की, कोणता विषय असणार.. त्यामुळे हैदराबाद गॅझेट, अमकं-तमकं सगळं घेऊन गेलो. तेव्हा तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं की, सरसकट हा शब्द काढून टाकला. आणखी हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू करतो. मी हैदराबाद गॅझेट पिशवीतून काढून ते उलगडून दाखवलं.'
'त्यात दाखवलं.. कुणबी एवढे, मराठा एवढे... याचा अर्थ काय कुणबी आणि मराठे वेगळे आहेत. त्यानंतर काहीही दुसरी चर्चा नाही.'










