महिला आयपीएस अंजली कृष्णा अजित पवारांना थेट नडल्या, वाळू तस्करी करणाऱ्यांचे उपटले कान, फोन कॉलवर काय घडलं?
Ajit Pawar Viral Call : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजली कृष्णा यांच्यात झालेल्या फोनकॉलची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवारांचा फोन कॉल व्हायरल

महिला पोलीस अधिकाऱ्यासोबक काय घडलं?
Ajit Pawar Viral Call : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजली कृष्णा यांच्यात झालेल्या फोनकॉलची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. आयपीएस अंजलीचं नाव अंजली कृष्णा असे आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन कॉल केला होता. त्यानंतर अजित पवारांनी बेकायदेशीररित्या वाळू उत्खननाची कारवाई करणं बंद करा असं सांगत आयपीएस अंजली कृष्णा यांना कारवाई करण्यास थांबवलं, पण तेव्हा अंजली कृष्णा यांनी आपल्या कामाशी निष्ठा ठेवत त्यांनी सुनावण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील आहे. त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation: OBC नाराज, मराठा आरक्षण देऊन भाजप चक्रव्यूहात अडकलं? CM फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल सुरू!
नेमकं काय घडलं?
माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्ता बांधण्याच्या कामासाठी बेकायदेशीररित्या वाळूच्या उत्खननाचे काम सुरू आहे. याच तक्रारीवरून अंजली कृष्णा या घटनास्थळी आल्या होत्या. तेव्हा ग्रामस्थ आणि घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हाच अवैधपणे वाळूचे खोदकाम करण्यासाठी आलेल्यांपैकी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बाबा देशमुखने अजितदादांना फोन केला होता. त्यानंतर अंजली कृष्णा यांना तो फोन दिला होता.
अद्यापही कारवाई नाहीच
सध्या या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. दुसरीकडे, अंजली कृष्णा, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी या घटनेवर कोणतेही विधान केलेलं नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं केवळ बोललं जात आहे. पण अद्यापही कारवाई केली गेली नाही.
हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! मित्रांचं सुरु होतं संभाषण, अचानक बोलणंच खटकलं, नंतर धारदार शस्त्राने मित्राचाच गळा चिरला अन् ...
संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी अजित पवारांचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'या कॉलचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचं बोलणं व्यवस्थित नसल्याचं' ते म्हणाले.