सासरा सुनेसोबत करायचा अश्लील चाळे...हुंड्यासाठीही महिलेचा करायचे छळ! एक दिवस पीडितेनं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन् घडलं..
Married Woman Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये एक महिला सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये गेली. महिलेनं सासरच्या नातेवाईकांविरोधात गंभीर आरोप लावले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हुंडा न दिल्याने सासरच्या लोकांनी महिलेला केली मारहाण

पोलिसांनी आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
Married Woman Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये एक महिला सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये गेली. महिलेनं सासरच्या नातेवाईकांविरोधात गंभीर आरोप लावले. सासरच्या लोकांनी मारहाण करून हुंड्याची मागणी केली आणि सासरा अश्लील चाळे करतो, असा आरोप महिलेनं केला. महिलेनं बुलंदशहर येथील सासरच्या लोकांनाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे.
हसायन विभागातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचं लग्न 2024 मध्ये शिकारपूर बुलन्दशहर येथे राहणाऱ्या तरुणासोबत झालं होतं. लग्नात वडिलांनी 8 लाख रुपये खर्च केले होते. काही दिवसानंतर पती, दीर, सास आणि सासऱ्याने मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. तसच सासरा अश्लील चाळे करतो, असा गंभीर आरोपही या महिलेनं केला आहे.
हुंडा न दिल्याने सासरच्या लोकांनी महिलेला केली मारहाण
सासरच्या लोकांच्या या कृत्याचा विरोध केल्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसच हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या लोकांनी मारहाण केल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. खूप समजावल्यानंतरही सासरच्या लोकांनी त्यांचं संतापजनक कृत्य सुरुच ठेवलं आणि महिलेला घराबाहेर काढलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. अलीगढ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातही महिलेला हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा >> Pune: नाना पेठेत गँगवार, बदला घेण्यासाठी आरोपीच्या मुलालाच केलं ठार.. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे हादरलं
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातही धक्कादायक घटना घडली होती. येथील एका नवविवाहित वधूचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या महिलेनं गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी पीडित महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या पती आणि सासूवर गंभीर आरोप केले. पती आणि पत्नीला कधीही एकट्यात झोपू दिले जात नव्हतं. पीडितेची सासू दोघा नवरा आणि बायकोच्या मध्ये झोपायचा, असे आरोप करण्यात आले होते.