65 वर्षांच्या वृद्ध महिलेने पतीवरच केला बलात्काराचा आरोप... पोलिसांना सांगितली सगळी कहाणी!
उत्तर प्रदेशातील गोरखपुरमध्ये एका 65 वर्षीय वृद्ध महिलेने तिच्या पतीवरच बलात्काराचा आरोप केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीने पतीवरच केला बलात्काराचा आरोप

65 वर्षांच्या वृद्ध महिलेवर पतीने केला बलात्कार...
Rape Case: उत्तर प्रदेशातील गोरखपुरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे एका 65 वर्षीय वृद्ध महिलेने तिच्या पतीवरच बलात्काराचा आरोप केल्याचं समोर आलं आहे. महिलेनं पोलिसांना सांगितले की ती बरीच वर्षे तिच्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा अचानक त्यांच्या घरी आला. पीडित म्हणाली की “आधी त्याने माझ्याशी भांडण केलं, नंतर दार बंद केलं आणि माझ्यावर बलात्कार केला.”
60 वर्षांच्या पत्नीवर बलात्कार...
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून हे प्रकरण झंगहा परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आणि सांगितलं की, तिच्या पतीसोबत तिचा बऱ्याच वर्षांपासून वाद सुरू आहे. ती अनेक वर्षांपासून तिच्या मुलीसोबत राहत आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा पती मुलीच्या घरी आला आणि त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर पतीने दार बंद करून पीडित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: तरुणीने दिला 'त्या' गोष्टीला नकार, तरुणाने थेट तरुणीचं नाकच कापलं अन्...
इतकेच नव्हे तर बलात्कार केल्यानंतर पतीने तिला धमकी सुद्धा दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
80 वर्षीय महिलेवर बलात्कार
यापूर्वी हरदोईमध्ये एका 80 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. संडीला कोतवाली परिसरातील एका गावात 30 वर्षीय तरुणाने शेळ्यांसाठी उसाच्या शेतात गवत कापणाऱ्या 80 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. अज्ञात तरुणाकडून माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी आरोपीला घटनास्थळावरून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. प्रकरणातील आरोपी नीरज हा सीतापूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: नाशिकच्या भाऊला अंत्यसंस्कारासाठी नेलं, पण तेव्हाच भाऊ खोकला अन्..
60 वर्षीय वृद्धाचं अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य...
तसेच, गेल्या आठवड्यात कुशीनगरमध्ये एका 60 वर्षीय वृद्धाने आधी एका अल्पवयीन मुलाशी बळजबरीने लग्न केलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीने वृद्धावर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.