जालन्यात वडिलांनीच लेकीचा गळा दाबून केली हत्या, लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचा रचला बनाव, हादरून टाकणारी घटना
Jalna Crime : जालन्यातील बदनापुर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनीच आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे, त्यमागचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यातील बदनापुर येथून धक्कादायक प्रकरण

बापानेच लेकीचा गळा दाबत केली हत्या

कारण ऐकून उडेल थरकाप
Jalna Crime : जालन्यातील बदनापुर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनीच आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे. वडिलांनी लेकीसोबत केलेल्या कृत्याचं कारण आता समोर आलं आहे. मुलीचं एका मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचे वडिलांना समजले. याच रागातून मुलीच्या वडिलांनी असं कृत्य केले आहे. त्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचा बनावही रचला होता. या धक्कादायक घटनेनंतर एका व्यक्तीने पोलिसांना फोनद्वारे संपर्क करत मुलीनं फाशी घेतल्याची माहिती दिल्याचं सांगितलं. मुलीची हत्या केलेल्या वडिलांचं नाव बाबुराव जोगदंड असे आहे.
हे ही वाचा : सप्टेंबर वर्षातील शेवटचं ग्रहण निर्माण होणार, काही राशीतील लोक धनवान होणार, काय सांगतं राशीभविष्य?
नेमकं काय घडलं?
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी 5 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस ठाणे बदनापूर हे नाईट ड्यूटी करत असताना बाबूराव जोगदंड यांच्या लेकीनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीने आत्महत्या केली नसून घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय बळावला गेला.
लेकीच्या हत्येमागचं कारण
पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांनी तात्काळ सूत्र हाती घेत प्रकरणाच्या खोलात शिरत तपास केला असता, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुलीने एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू ठेवल्याने मुलीच्या वडिलांना अपमानाचा सामना करावा लागला. यामुळेच गळा दाबून मुलीची हत्या केली. त्यानंतर हे प्रकरण उघडं पडू नये म्हणून त्यांनी बनाव रचून मोठं कांड केलं.
हे ही वाचा : पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात प्राथमिक चौकशी केली असता, सदर मुलीच्या वडिलांनी मुलीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं भासवलं. पण वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याचं सांगितलं. दरम्यान, या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.