"माझे पप्पा लहान भावाचे जास्त लाड..." वडिलांवरील रागामुळे मोठा मुलगा नको ते करून बसला अन्...
बिहारमध्ये एका तरुणाने त्याच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. वडील लहान भावाचे अधिक लाड आणि आदर करत असल्यामुळे आरोपी मुलाने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लहान भावाचे जास्त लाड होत असल्यामुळे मोठ्या मुलाचा वडिलांवर राग...

वडिलांवरील रागामुळे मोठा मुलगा नको ते करून बसला अन्...
Crime News: बिहारमध्ये एका तरुणाने त्याच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. वडील लहान भावाचे अधिक लाड आणि आदर करत असल्यामुळे आरोपी मुलाने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना मधुबनी जिल्ह्यातील लौकही पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या करियौत गावात घडल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या 40 वर्षीय धनेश्वर यादव या शेतकऱ्याच्या हत्येचं प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणलं आहे.
आरोपी मुलाला अटक
घटनेनंतर दोन दिवसांच्या आत म्हणजेच शुक्रवारी पोलिसांनी मृताचा मोठा मुलगा पप्पू कुमार यादव (19 वर्षे) याला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, घटनेत वापरण्यात आलेली कुदळ देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीच संबंधित प्रकरणाची माहिती दिली.
हे ही वाचा: 'त्या' कारणावरून केली प्रेयसीची हत्या, नंतर तिचाच फोन घेऊन... 8 महिन्यांनंतर समोर आलं 'ते' सत्य!
लहान भावाचे जास्त लाड...
चौकशीदरम्यान, अटकेनंतर आरोपी मुलाने त्याचा गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी पप्पूने पोलिसांनी सांगितलं की त्याचे वडील त्याला नेहमी मारहाण करायचे आणि त्याच्या लहान भावाचे जास्त लाड आणि आदर करायचे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तपास सुरू केला होता. आरोपी मुलगा वडिलांची हत्या करून घरातून फरार झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच, पोलिसांपासून वाचण्यासाठी तो लपण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली.
हे ही वाचा: पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांच्या टीमने केवळ दोन दिवसातच प्रकरणातील आरोपी शोध घेतला आणि त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या रात्री धनेश्वर त्याच्या गुरांच्या घरात झोपला होता आणि त्याच वेळी त्याचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर, मृताची पत्नी लडूदेवी हिने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका अझात विरोधात गुन्हा दाखल केला होता. चौकशीदरम्यान, पत्नीने सुद्धा त्यांचं गावातील कोणासोबतच शत्रुत्व नसल्याचं सांगितलं होतं. प्रकरणातील आरोपी मुलाला अटक केल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचं हे प्रकरण आता परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.