पत्नीच्या अफेअरला वैतागला होता पती..सासरच्या लोकांना समजंवायला गेला, मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घडलं तरी काय?
Couple Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये पत्नीला घेण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणासोबत सर्वात भयंकर घटना घडली. तरुणाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नी चार दिवसांपूर्वी प्रियकरासोबत फरार झाली अन्..

पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

त्या गावात नेमकं काय घडलं?
Couple Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये पत्नीला घेण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणासोबत सर्वात भयंकर घटना घडली. तरुणाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. तरुण पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे नैराश्यात होता. परंतु, तरुणाच्या मृत्यूबाबत समजताच कुटुंबियांना हादरा बसला. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पत्नी आणि सासरच्या लोकांसह महिलेच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाचं पोस्टमार्टम करून कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे.
पत्नी चार दिवसांपूर्वी प्रियकरासोबत फरार झाली अन्..
ही धक्कादायक घटना गागलहेडी विभागात घडली. कपूरी गोविंदपूर येथील रहिवासी ओमपालने म्हटलंय की, त्याचा भाऊ सोनीचं 15 वर्षांपूर्वी कोलकी गावात लग्न झालं होतं. त्याच्या भावाची पत्नी चार दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली होती. त्यानंतर सोनी पत्नीला समजवण्यासाठी सासरी गेला होता.सोनीनं समजावल्यानंतरही महिला प्रियकरासोबतच राहण्याची जिद्द धरून बसली.
ओमपालने म्हटलंय की, शनिवारी सकाळी त्यांना सूचना मिळाली की, सोनीने तणावात येऊन सासरच्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना धक्का बसला. सोनीला पाच मुलं आहेत. तो मजुरी करून त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. एसएसपी मनोज कुमार यांनी म्हटलंय की, मृताच्या भावाच्या तक्रारीनुसार, सोनीची पत्नी, सासरचे लोक आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अटकेची कारवाई केली जाईल.
हे ही वाचा >> पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धक्कादायक घटना घडली होती. तीन मेव्हण्यांनी मिळून फिल्मी स्टाईलने दाजीचं अपहरण केलं होतं. आरोपींनी आधी पीडित दाजीचे हात-पाय दोरीने बांधले, तोंडाला कापड बांधलं आणि त्याला कारच्या डिक्कीत टाकलं. पोलिसांना म्हटलंय की, 25 वर्षांपूर्वी त्याचं लग्न हाथरसमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीसोबत झालं.
पत्नीच्या माहेरच्या लोकांचा आपल्या जमिनीवर डोळा असल्याचा हरदेवने आरोप केला. याच कारणामुळे घरात सतत वाद व्हायचे. हरदेवने सांगितल्याप्रमाणे, बुधवारी (3 सप्टेंबर) त्याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. नंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करत असताना त्याचे मेहुणे राजपाल, सत्यपाल आणि धर्मवारी यांच्यासह पाच जण हरदेवच्या घरी गेले. आरोपींनी हरदेवला पकडून त्याचे हात-पाय बांधले आणि तोंडाला कापड बांधून त्याला कारच्या डिक्कीत टाकलं.