गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट! पोलिसांनी 10 महिलांना ताब्यात घेतलं..धक्कादायक माहिती उघड होताच उडाली खळबळ

Today Shocking Viral News :  रांची पोलिसांनी रविवारी एका सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट रांचीच्या लालपूर परिसरात काही महिलांच्या माध्यमातून गर्ल हॉस्टेलमध्ये सुरु होतं.

ADVERTISEMENT

घरमालक आणि ४ महिलांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधीक प्रतिमा)
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी महिला पश्चिम बंगालच्या, अल्पवयीन मुलींचाही समावेश 

point

गर्ल्स हॉस्टेलच्या मॅनेजरलाही घेतलं ताब्यात 

point

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं?

Today Shocking Viral News :  रांची पोलिसांनी रविवारी एका सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट रांचीच्या लालपूर परिसरात काही महिलांच्या माध्यमातून गर्ल हॉस्टेलमध्ये सुरु होतं. रांचीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, या गुन्ह्यात सामील असणाऱ्या 10  महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसच पोलिसांनी एका हॉस्टेल मॅनेजरलाही ताब्यात घेतलं आहे.

रांचीचे डेप्युटी एसपी (शहर) केवी रमन यांनी म्हटलंय की, पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला सूचना मिळाली होती की, काही लोक संघटितपणे दुसऱ्या राज्यातील तरुणींना या ठिकाणी घेऊन येतात. या मुलींकडून सेक्स वर्करचं काम करून घेतलं जातं. या रॅकेटची खबर मिळताच पोलिसांची एक टीम गठित करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ओम गर्ल्स हॉस्टेलवर छापा टाकला. 

आरोपी महिला पश्चिम बंगालच्या, अल्पवयीन मुलींचाही समावेश 

पोलिसांनी त्या ठिकाणाहून 10 मुलींना ताब्यात घेतलं. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यामध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. पोलीस सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटमध्ये सामील असलेल्या आरोपींच्या विरोधात कारवाई करत आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या बहुतांश मुली पश्चिम बंगालच्या असून सर्व अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीय.

हे ही वाचा >> निवडणुकीआधी भाजपला 'इथं' मिळाला पहिला धक्का, भाजपला दूर सारून शिंदेंशी युती करणारा 'तो' बडा नेता कोण?

गर्ल्स हॉस्टेलच्या मॅनेजरलाही घेतलं ताब्यात 

पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, या मुली हॉस्टेलमध्ये राहतात. हॉस्टेलच्या मॅनेजरलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तसच हॉस्टेलच्या मालका विरोधातही कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात सामील असलेले आरोपी, जे मुलींची डील करतात आणि त्यांना दुसऱ्या जागी पाठवतात, त्यांचीही चौकशी केली जात आहे. यामध्ये सक्रिय असलेल्या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं जाईल. या महिलांचा इतर कोणत्या रॅकेटशी संबंध आहे का? इतर कोणत्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटिंगचं काम सुरु आहे का? याचाही तपास केला जात आहे. 

हे ही वाचा >> MPSC परीक्षेतील टॉपर, PSI अश्विनी केदारीने अत्यंत क्षुल्लक कारणाने गमावला जीव.. त्यावेळी नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp