निवडणुकीआधी भाजपला 'इथं' मिळाला पहिला धक्का, भाजपला दूर सारून शिंदेंशी युती करणारा 'तो' बडा नेता कोण?
Ulhasnagar Politics: उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीआधी माजी आमदार पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपला जोरदार धक्का देत शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
ADVERTISEMENT

Shiv Sena vs BJP: उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजपला धक्का देत शिवसेना आणि टीम ओमी कलानी (TOK) यांनी हातमिळवणीची घोषणा केली आहे. युतीनंतर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
उल्हासनगर शहराच्या राजकारणात कलानी कुटुंबाचा प्रभाव नेहमीच निर्णायक ठरत होते. तसेच अनेक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर सध्या बाहेर असलेले माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी हे पुन्हा सक्रिय झाल्याने राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. मात्र, दोन विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभव, कधी राष्ट्रवादी, कधी भाजप आणि आता शिंदेंची शिवसेनेसोबत युती करून स्वतःचे अस्तित्व वाचण्याची लढाई सुरू आहे.
उल्हासनगरमधील नेमकं राजकारण काय?
◆ 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या समोर टीओके+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओमी कलानी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ओमी कलानी पराभव झाले.
हे ही वाचा>> IPS अंजना कृष्णा यांना 'इतना डेरिंग...' असं म्हणणाऱ्या अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 'मला तर महिला अधिकाऱ्यांचा सर्वोच्च आदर..'
◆ आता उल्हासनगर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कुणाची तरी साथ हवी म्हणून टीम ओमी कलानीने शिंदेंची शिवसेनेसोबत युती केली आहे. या युतीला दोस्तीची गठबंधन असं नाव दिलं आहे. मात्र, भाजपासोबत जाऊन महापौर पद मिळवलं आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांना महापौर पदावर बसवलं.










