कोकणात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, कसं असेल हवामान?
maharashtra weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि उपलब्ध माहितीच्या आधारे, 8 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभागानुसार हवामानाचा अंदाज

8 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे:
Maharashtra Weater : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि उपलब्ध माहितीच्या आधारे, 8 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज खालीलप्रमाणे आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांचा समावेश आहे. यापैकी मुंबईसह कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर एकूण राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात.
हे ही वाचा : लालबागच्या राजाच्या विसर्जनाचं कंत्राट गुजरातला, कोळी बांधवांकडून नाराजीचा सूर, म्हणाले 'गुजरातचा तराफा आल्याने...'
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात हवामान विभागाने ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच याच भागातील कमाल तापमान हे 28-30°C आहे तर किमान तापमान हे 24-26°C आहे.
मध्य महाराष्ट्र :
कोकणानंतर मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच जळगाव, धुळे येथे तुरळक ठिकाणी उळवकन विभागाने जोरदार पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच हवामान विभागाने कमाल 30-32°C ते किमान 22-24°C तापमानच अंदाज जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना येथे हलक्या पावसाची शक्यता, इतर भागात कोरडे हवामानाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला. तर काही हवामान विभागाने ठिकाणी ढगाळ वातरणाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कमाल तापमान हे 32-34°C ते किमान 22-24°C असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : किराणा दुकानदाराकडे होती थकबाकी, पैसे देण्यास ग्राहकाला झाला विलंब, नंतर 220 रुपयांसाठी बेदम मारहाण अन् ...
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा येथे हलक्या पावसाची शक्यता, तर गडचिरोली, चंद्रपूर येथे कोरडे हवामान. ढगाळ वातावरण राहील. तसेच कमाल 33-35°C ते किमान 23-25°C राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.