Lalbaugcha Raja Visarjan LIVE: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर पुन्हा सुरू, तब्बल 12 तास राजाचं विसर्जन का रखडलं?

Lalbaugcha raja visarjan : लालबागचा राजा विसर्जन करताना केवळ पाच फुटापर्यंतच पाण्यात स्थिरावलेला दिसून येत आहेते. याचमुळे आता कोळी बांधवांनी लालबागच्या मंडळावर काही गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली. लालबागचा राजा विसर्जित न होण्यामागचे कारणही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Lalbaghcha Raja Visarjan
लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब

point

गुजरातचा तराफा आणल्याची चर्चा

point

कोळी बांधवांची नाराजी

Lalbaghcha Raja Visarjan : मुंबईसह देशभरात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. जगभरातून असंख्य गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात. पण, यंदा याच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्याचं दिसून आलं. गिरगाव चौपाटीवरील समुद्रात विसर्जनासाठी स्वयंचलित हायड्रोलिक यंत्रणेसह खास लालबागच्या राजासाठी खास तराफा तयार करण्यात आला होता. बाप्पा केवळ पाच फुटापर्यंतच पाण्यात स्थिरावलेले दिसून येत होते. त्यानंतर तब्बल 12 तास हे विसर्जन लाबलं आहे. दरवर्षी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत राजाचं विसर्जन होतं. मात्र, यंदा भरतीच्या आधी तराफ्यावर मूर्ती चढू न शकल्याने सकाळी बाप्पाचं विसर्जन झालं नाही. अखेर आता थोड्याच वेळी लालबागच्या राजाचं विसर्जन हे सुरू झालं आहे. 

पाहा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा

दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे मुंबईतील कोळी बांधवांनी लालबागच्या मंडळावर काही गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.  

हे ही वाचा : जालन्यात वडिलांनीच लेकीचा गळा दाबून केली हत्या, लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचा रचला बनाव, हादरून टाकणारी घटना

नेमकं काय कोळी बांधव म्हणाले

नमस्कार, मी गिरगाव चौपाटीचा नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर... आपल्या माध्यमातून बोलतोय. गिरगावाथ लालबागच्या राजाचं अद्यापही विसर्जन झालं नाही. गेली अनेक वर्षे लालबागच्या राजाचं विसर्जन आम्ही वाडकर बंधूच करत होतो. पण, यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठीचा तराफा गुजरातहून आणण्यात आला. काही कारणांमुळे लालबागच्या राजाचं अद्यापही विसर्जन झालं नाही. 

गुजरातचा तराफा आल्याने...

वाडकर बंधूच वर्षानुवर्षे हे विसर्जन करत होते. आता गुजरातचा तराफा आल्याने लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांनाच दिलंय. लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यावी, असे गिरगाव चौपाटीचे हिरालाल वाडकर यांनी आपल्या भावना एका व्हिडिओच्या माध्यामातून व्यक्त केल्या आहेत. 

हे ही वाचा : बाप्पाच्या विसर्जनादिवशी अनर्थ घडला, मंडळाचा कार्यकर्ता झाडावर चढला अन् होत्याचं नव्हतं झालं

लालबागच्या राजाची नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळख आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी होताना दिसते. अनेक भक्त आता देवाला साकडं घालतं आहे. काही भक्तगणांनी आमच्याकडून झालेल्या चुकांना देवा क्षमा कर. पुढे तुझ्या सेवेत हलगर्जीपणा होणार नसल्याची प्रार्थना केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp