मुंबईची खबर: गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज! 3000 ऑफिसर्स, 18,000 पोलीस कर्मचारी अन् आता AI...

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत 21,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज!
गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणपती विसर्जनासाठी मुंबई सज्ज!

point

पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथके आणि आता AI ची देखील मदत...

Mumbai News: गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत 21,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पहिल्यांदाच, पोलीस वाहतूक व्यवस्थापन आणि इतर वाहतूक-संबंधित सुव्यवस्था राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.

विशेष पोलीस पथके तैनात... 

अधिकाऱ्यांच्या मते, 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उप पोलीस आयुक्त, 61 सहाय्यक पोलिस आयुक्त, 3,000 अधिकारी आणि 18,00 पोलीस या दलात सहभागी असतील. याव्यतिरिक्त, राज्य राखीव पोलीस दलाच्या 14 कंपन्या, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार कंपन्या, जलद प्रतिक्रिया पथक आणि बॉम्ब शोधक पथक देखील तैनात केले जातील.

हे ही वाचा: Lalbaugcha Raja 2025 live: पुढच्या वर्षी लवकर या! पाहा लालबागच्या राजाची मिरवणूक लाइव्ह.. मुंबईत जल्लोषात विसर्जन मिरवणूक!

65 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 205 कृत्रिम तलाव 

सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले की, गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने विशेष व्यवस्था केली आहे. या वर्षी मुंबईत 6,500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून मूर्तींच्या विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी 65 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 205 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. सध्या, विसर्जन मार्ग पूर्णपणे मोकळे करण्यात आले आहेत.

हे ही वाचा: झुडपात अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह! त्या अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

दहशतवाद्यांविरोधी उपाययोजना 

राज्य राखीव पोलीस दलाच्या 14 तुकड्यांव्यतिरिक्त, 4 रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि 3 दंगल नियंत्रण पथके असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, 10 हजार सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, गणेशोत्सवादरम्यान ड्रोनने पाळत ठेवली जाईल आणि एआय तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. गणपती विसर्जनादरम्यान, संवेदनशील ठिकाणे ओळखली जातील आणि तेथे विशेष पोलिस दल तैनात केले जातील. पोलिसही साध्या पोशाखात उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दहशतवाद्यांविरोधी उपाययोजना देखील काटेकोरपणे राबवण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp