वडिलांना 'त्या' एका गोष्टीचा होता लेकीवर राग, नंतर नातीसह लेकीवर कोयत्याने केले सपासप वार...
crime news : प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या वडिलांनी तिला आणि तिच्या एका वर्षाच्या बाळाला मारहाण करत हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैराटची पुनरावृत्ती

तरुणीच्या वडिलांना लेकीला आणि नातीला केली मारहाण

नेमकं पुढं काय घडलं?
Crime News : लव्ह मॅरेज प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कुटुंबियांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केल्यानंतर जोडप्यांना अनेकदा कुटुंबाचा सामना करावा लागतो. कारण कुटुंबाच्या विरोधात जाऊन केलेल्या लग्नामुळे अनेकदा सैराटची पुनरावृत्ती बघायला मिळते. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या वडिलांनी तिला आणि तिच्या एका वर्षाच्या बाळाला मारहाण करत हत्या केली आहे. ही घटना पंजाबच्या बठिंडा येथे सोमवारी घडली.
हे ही वाचा : मुलींच्या वसतिगृहात सुरू होता घाणेरडा खेळ, परराज्यातून महिलांचं सुरू होतं सेक्स रॅकेट, एका झटक्यातच...
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, मुलीने सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी स्वत:च्या मर्जीने त्याच गावातील एका तरुणाशी विवाह केला होता. लग्नापूर्वी पीडितेच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर घरातच बराच काळ वाद सुरू होता. या जोडप्याला सुमारे दीड वर्षांची मुलगी होती.
डिलांना आणि भावाने तिला वाटेतच थांबवलं अन्...
सोमवारी, तरुणी आपल्या मुलीला घेऊन औषध आणण्यासाठी बाहेर गेली होती. दरम्यान, गावाजवळ तिच्या वडिलांना आणि भावाने तिला वाटेतच थांबवलं आणि दोघांवरही कोयत्याने हल्ला करत सपासप वार केलेत. या हल्ल्यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचली असता, एकच खळबळ उडाली. लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा : वडिलांनी लेकावर कुऱ्हाडीने हल्ला करत केला खून, नंतर आई आणि मुलीलाही दिली धमकी अन्...
पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांवर आणि भावावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नसल्याचं पोलीस म्हणाले.