रात्री पत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, पतीने सगळ्यानांच टाकलं हादरवून!
बिहारच्या मधेपुरा येथे एका तरुणाने त्याच्या जवळच्या मित्राचा कटरने गळा चिरून खून केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीचे पतीच्या मित्रासोबतच अनैतिक संबंध...

पतीने पाहिलं अन् रागाच्या भरात घडली भयानक घटना!
Murder Case: बिहारच्या मधेपुरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने त्याच्या जवळच्या मित्राचा कटरने गळा चिरून खून केल्याची बातमी समोर आली आहे. मृताचं नाव राजीव कुमार असून तो भाटनी पोलिस स्टेशन परिसरातील बरहकुरवा वॉर्ड-12 येथील अनिल यादव यांचा 17 वर्षीय मुलगा असल्याची माहिती आहे. हे हत्याकांड गुरुवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, प्रकरणातील आरोपीचं नाव विजय कुमार असल्याची माहिती समोर आली आहे.
मृताच्या कुटुंबियांनी दिली माहिती
मृत तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री 10 वाजता राजीवचा मित्र विजय त्याला मोटारच्या वायर्स जोडण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर, राजीवची त्याच्याच घरात हत्या करण्यात आली. राजीवच्या मानेचा अर्धा भाग एका कानासह कापण्यात आला होता. मृताच्या घरापासून आरोपी मित्राचं घर एक किमी अंतरावर आहे. मृत राजीव मजूर म्हणून काम करायचा.
हे ही वाचा: कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?
मित्रासोबतच पत्नीचे अनैतिक संबंध
मृताचे विजयच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची गावात चर्चा होती, असं सांगितले जात आहे. आरोपी विजयने घराची मोटर दुरुस्त करण्याच्या बहाण्याने राजीवला त्याच्या घरी बोलावलं होते. त्यानंतर त्याच्या घरी दारूची पार्टी झाली आणि त्या दिवशी राजीव त्याच्या घरीच राहिला. रात्री विजय झोपल्यानंतर त्याची पत्नी राजीवकडे गेली आणि त्यावेळी विजयने आपल्या पत्नीला राजीवसोबत पाहिलं.
हे ही वाचा: गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली..तरुणाने टेन्शनमध्ये केलं भयंकर कृत्य, अख्ख गाव हादरलं!
धारदार कटरने केला हल्ला
यानंतर विजयने राजीववर धारदार कटरने हल्ला केला. पहिल्या हल्ल्यात राजीवचा कान कापला गेला. त्यानंतर दुसऱ्या हल्ल्यात त्याची मान कापली गेली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. राजीवच्या मृत्यूनंतर, विजय त्याचा मृतदेह घराच्या अंगणातच सोडून पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. काही तासांतच आरोपी विजयला अटक करण्यात आली.
या प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या हत्याप्रकरणात तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.