मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थ्याला घेऊन जायचा बाथरूममध्ये, नंतर चुंबन घेत प्रायव्हेट पार्टसोबत नको तेच...

crime news : मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थ्याला घेऊन जायचा गच्चीवर तर कधी बाथरूममध्ये, नंतर प्रायव्हेट पार्टला लावायचा हात.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा

point

खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने केलं वाईट कृत्य

point

लहान विद्यार्थ्याला घेऊन गेला बाथरूममध्ये नंतर...

crime news: गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवीयन विद्यार्थ्याशी गैरवर्तन केलं. शैलेश खुंट असे आरोपीचं नाव आहे. मुख्याध्यापकाने गृहपाठ देणार नाही असे लहान मुलाला आमिष दाखवून त्याच्यासोबत वाईट कृत्य केलं. संबंधित प्रकरणात आरोपीने पोलिसांना अटक केली आहे.

हे ही वाचा : बाप्पाच्या विसर्जनादिवशी अनर्थ घडला, मंडळाचा कार्यकर्ता झाडावर चढला अन् होत्याचं नव्हतं झालं

पीडित मुलाने शाळेत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर हा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याने आपल्या आई वडिलांसमोर अश्रू ढाळले. पीडिताच्या आईने संबंधित प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, मुलगा बाबरा तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेत होता. त्यांच्या गावापासून 35 लहान मुलं शाळेत जातात. मुलगा शाळेत जाण्यापूर्वी दोन दिवसांपासून रडत होता.

बाथरूममध्ये नेलं आणि गुप्तांगाला लावला हात

पालकांनी अनेकदा त्याच्याकडे विचारपूस केली असता, पीडिताने मुख्याध्यापकांने केलेलं संपूर्ण कृत्य सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, मुख्याध्यापक शैलेश खुंट गेल्या एका वर्षापासून त्याच्यासोबत अश्लील कृत्य करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याला एकटे बोलवायचा. त्यानंतर शाळेच्या मागे असलेल्या कम्प्युटर लॅबमध्ये, कधी छतावर तर कधी जुन्या बाथरूममध्ये घेऊन जायचा आणि त्याच्यावर विनयभंग करायचा. एवढंच नाही,तर त्याने विद्यार्थ्याच्या गुप्तांगालाही हात लावला होता आणि अनेकदा चुंबनही घेतलं होतं.

हे ही वाचा : जालन्यात वडिलांनीच लेकीचा गळा दाबून केली हत्या, लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचा रचला बनाव, हादरून टाकणारी घटना

'तु कोणाला काहीही सांगू नकोस मी तुला...' 

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला घरी काहीही सांगू नको, मी तुला गृहपाठही देणार नाही. मी तुला शाळेतही काहीही बोलणार नाही, असं आमिष दाखवले. यामुळेच विद्यार्थी मुलानं काहीही सांगितलं नाही, पण त्यानंतर त्याने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार हा आईला सांगितला आणि आईने बाबरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुख्याध्यापकाविरोधात भारतीय न्यायसंहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोक्सो कायद्याच्या 8 आणि 10 कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp