महिलेला झाडाला बांधलं अन् कपडे फाडले! रॉडने मारहाण करून महिलेची हत्या केली..आरोपीने Video व्हायरल केला अन्...
Today Shocking Viral News : देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. येथे तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात एका महिलेला झाडाला बांधून 4 महिलांनी तिला जबर मारहाण केली आणि तिचे कपडे फाडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेला झाडाला बांधून मारहाण केली

सोशल मीडियावर व्हायरल झाला मारहाणीचा व्हिडीओ

महिलेला अमानूष मारहाण केली अन् नंतर घडलं..
Today Shocking Viral News : देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. येथे तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात एका महिलेला झाडाला बांधून 4 महिलांनी तिला जबर मारहाण केली आणि तिचे कपडे फाडले. तसच दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या हरदोईमध्ये मुलांचं भांडण झाल्यानंतर भयंकर घटना घडली. येथील महिलेला लाठ्या-काठ्यांनी मारून तिची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महिलेला झाडाला बांधून मारहाण केली
तामिळनाडूच्या कुड्डोलोर जिल्ह्यात झालेल्या जमिनीच्या वादामुळे एक महिलेनं भयंकर कृत्य केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार महिलांनी मिळून पीडितेला तिच्याच साडीने झाडाला बांधलं. त्यानंतर तिला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. याचदरम्यान महिलेचे कपडेही फाडले.
सोशल मीडियावर व्हायरल झाला मारहाणीचा व्हिडीओ
ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली अन् हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. तर अन्य तीन महिला अजूनही फरार आहेत.
हे ही वाचा >>पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?
महिलेला अमानूष मारहाण केली अन् नंतर घडलं..
उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली. येथे लहान मुलं खेळत असताना वाद इतका वाढला की दोन्ही कुटुंब आपापसात भिडले. हल्लेखोरांनी घरात असलेल्या 40 वर्षीय महिला रहमानी उर्फ आलियावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. तिने आरडाओरडा केल्यावर शेजारचे लोक तिथे पोहोचले. पण तोपर्यंत आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले होते.
पोलिसांनी याप्रकरणी म्हटलंय की, जखमी महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे तिचा मृत्यू झाला. सर्कल ऑफिसर अनीत मिश्रा यांनी म्हटलंय की, महिलेचा पती रज्जाकने चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपींमध्ये मुशफ्फर, शेर अली, नसीम नावाचा व्यक्ती आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरु आहे.