“मधल्या सुट्टीत सरांनी माझ्यासोबत...” चौथीमधील विद्यार्थिनीसोबत शिक्षकांनं केलं नको ते!
शाळेच्या मधल्या सुट्टीत आरोपी शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला दुसऱ्या वर्गात पाठवलं जिथे कोणीही नव्हतं आणि तिथे जाऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
4 थीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं अश्लील कृत्य
मुलीच्या आईने नोंदवली तक्रार अन्...
Crime News: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एका शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत असं कृत्य केलं की ज्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत आरोपी शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला दुसऱ्या वर्गात पाठवलं जिथे कोणीही नव्हतं आणि तिथे जाऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर विद्यार्थिनी रडत घरी पोहोचली आणि तिने सराफत खान नावाच्या शिक्षकाने तिच्यासोबत केलेल्या दुष्कृत्याबद्दल तिच्या आई आणि कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे प्रकरण खटला दबोह पोलीस स्टेशन परिसरातील एका शाळतील असल्याची माहिती आहे.
मुलीच्या आईने पोलिसांना दिली माहिती..
मुलीच्या आईने पोलिसांना सांगितलं की “माझी मुलगी शाळेतून रडत घरी आली. तिने मला सांगितलं की सराफत सरांनी तिला पुस्तके ठेवण्यासाठी दुसऱ्या खोलीत पाठवलं. तिथे गेल्यानंतर सर मागून आले आणि त्यांनी तिला पकडलं. त्या शिक्षकाने माझ्या मुलीसोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर माझी मुलगी घाबरली आणि तिला ताप आल्याचं सांगून रडत घरी आली. दरम्यान, आरोपी शिक्षक घटनास्थळावरून पळून गेला.
हे ही वाचा: ‘मॅगी’साठी प्रसिद्ध असलेल्या Nestle कंपनीच्या बॉसचे जुनिअरसोबत रिलेशनशिप! CEO ची नोकरी गेली अन्...
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी सर्व विद्यार्थी मधल्या सुट्टीत बाहेर गेले होते. मुलीच्या आईने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मी मुलीला माझ्या पतीसह पोलीस ठाण्यात पाठवलं. ही बातमी मिळताच हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिस ठाण्यात पोहोचून निषेध केला. महिला पोलिस ठाण्याच्या प्रभारी क्रांती राजपूत यांनी पीडित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला.










