सर्वात भयंकर घटना! भर रस्त्यात नग्न अवस्थेत आढळला परदेशी महिलेचा मृतदेह... नेमकं घडलं तरी काय?
गुरुग्राममध्ये रविवारी (7 सप्टेंबर) सकाळी आयएमटी मानेसर चौकाच्या फ्लायओव्हर खाली एका परदेशी महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नग्न अवस्थेत आढळला परदेशी महिलेचा मृतदेह

भर रस्त्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ...
Murder Case: गुरुग्राममध्ये रविवारी (7 सप्टेंबर) सकाळी आयएमटी मानेसर चौकाच्या फ्लायओव्हर खाली एका परदेशी महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक तपासात हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल
स्थानिक पोलिसांनी तातडीने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि मानेसर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सीन ऑफ क्राइम यूनिटचे अधिकारी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले.
हे ही वाचा: वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांनी घरी बोलवलं अन् सरप्राइजच्या जागी मोठी शिक्षा... तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय रेकॉर्ड्सचा तपास केला जात आहे. याव्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित भारतीय मिशनशी संपर्क साधून ती महिला परदेशी महिला कोण होती आणि तिला शेवटचं कुठे पाहिलं गेलं? याचा शोध घेण्यात येत आहे.
सीसीटीव्ही फुटेजचा तपास
पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की महिलेची दुसऱ्याच ठिकाणी हत्या करण्यात आली असून, नंतर तिचा मृतदेह मानेसर येथील एका रस्त्यावर फेकून देण्यात आला. प्रकरणातील आरोपीची ओळख पटली आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा: महिलेला झाडाला बांधलं अन् कपडे फाडले! रॉडने मारहाण करून महिलेची हत्या केली..आरोपीने Video व्हायरल केला अन्...
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच, अल्पवयीन तरुणींवर होणाऱ्या शारीरिक अत्याचारात वाढ होत असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात सुद्धा अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं होतं. येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह झुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटल्यानंतर, मुलगी घटनेच्या दिवशी वाटेत कोणाला भेटली आणि ही घटना कोणी घडवली, याचा पोलीस तपास करत आहेत.