वडिलांना भेटायला आलोय असं सांगितलं..अल्पवयीन मुलीनं दरवाजा उघडला, नराधमाने तिच्या तोंडाला कापड बांधून बलात्कार केला!
Minor Girl Rape Crime News : उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. परसरामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात बलात्काराची संतापजनक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नराधम आरोपीने 14 वर्षीय मुलीवर केला अत्याचार

मुलीच्या तोंडाला कापड बांधला अन्..

त्या गावात नेमकं काय घडलं?
Minor Girl Rape Crime News : उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. परसरामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात बलात्काराची संतापजनक घटना घडली. नराधम आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना भेटण्याच्या बहाण्याने घरात घुसले आणि त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
पीडित मुलीच्या तोंडाला कपडा बांधून आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. पोलीस अधिकारी भानुप्रतार सिंह यांनी म्हटलं की, तक्रारीनुसार आरोपी सलमान विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह अन्य कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पीडितेचं मेडिकल करून पुढील कारवाई सुरु केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या तोंडाला कापड बांधला अन् अत्याचार केला
14 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलंय की, 30 ऑगस्टच्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपींनी घराचा दरवाजा नॉक केला. घरात झोपेत असलेली मुलगी जागी झाली आणि ती दरवाज्याजवळ गेली. त्यानंतर आरोपींनी मुलीला सांगितलं की, त्यांना वडिलांना भेटायचं आहे. त्यांनंतर मुलीनं दरवाजा उघडला. आरोपी घरात घुसल्यावर त्यांनी मुलीला पकडलं आणि तिच्या तोंडाला कपडा बांधला. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आणि कोणाला सांगितलं तर, कुटुंबियांना जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली. मुलीनं हिंमत करून घरच्या लोकांना घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.
हे ही वाचा >> फ्लाइटमध्ये शेजारी बसली सुंदर महिला जुळलं सूत, पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' गोष्टीमुळे...
महिलेसोबत केलं होतं अश्लील कृत्य
परसरामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या एका महिलेसोबतही धक्कादायक घटना घडली होती. पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं की, 1 ऑगस्ट रोजी आरोपींनी तिला मारहाण करत अश्लील कृत्य केलं होतं. पोलीस अधिकारी भानुप्रताप सिंह यांनी म्हटलं होतं की, आरोपी सोहनलाल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.