अजित पवारांनी IPS अधिकाऱ्याला फोन केलेल्या गावात महसूल अधिकाऱ्यांना मारहाण.. Video तुफान व्हायरल
Viral Video: कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाच्या तक्रारींनंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

नितीन शिंदे, सोलापूर: माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाच्या तक्रारींनंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असतानाचं ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातात स्टिक दिसत आहेत, ज्याचा वापर मारहाणीसाठी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. पोलीस आणि काही स्थानिकांनी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही गावकरी आक्रमक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.
यापूर्वी अवैध उत्खननाविरोधात कारवाई करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना खडसावले होते आणि कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.
हे ही वाचा>> IPS अंजना कृष्णा यांना 'इतना डेरिंग...' असं म्हणणाऱ्या अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 'मला तर महिला अधिकाऱ्यांचा सर्वोच्च आदर..'
या घटनेत अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (8 सप्टेंबर) कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे व ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत दाखल करण्यात आला.










