धाराशीव तालुक्यात कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली हत्या, नंतर स्वत:च गळफास लावला अन्... हादरून टाकणारी घटना
maharashtra crime : धाराशिव तालुक्यतील कोल्हेगावात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी असलेले श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 35) यांनी कौटुंबिक वादातूनच पत्नी साक्षी (वय 28) हिची हत्या केली. त्यानंतर श्रीकृष्णने गळफास घेत आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धाराशिव तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना

नवऱ्याने पत्नीची केली हत्या

नेमकं काय घडलं?
Maharashtra Crime : धाराशिव तालुक्यातील कोल्हेगावात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी असलेले श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 35) यांनी कौटुंबिक वादातूनच पत्नी साक्षी (वय 28) हिची हत्या केली. त्यानंतर श्रीकृष्णने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण आणि साक्षी या दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. रविवारी सकाळी किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद झाला, त्यानंतर वाद अधिकच वाढू लागला होता. त्यानंतर पती श्रीकृष्णने पत्नीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत श्रीकृष्णचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मानसिक तणावाखाली त्यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली.
चिठ्ठीत नेमकं काय?
या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. धाराशीव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने पंचनामा करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एका चिठ्ठीत सापडली असून तिच्या मजकुराबाबत अद्यापही कसलीही माहिती उघड करण्यात आली. दोघांमध्ये केवळ कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. पतीनंही आत्महत्या करण्यामागचं खरं कारण समोर आलं नाही.
हे ही वाचा : बीड हुंडाबळी! सासरच्यांकडून तरुणीला पाच लाखांची मागणी, नंतर मारहाण करत नवरा म्हणाला तू आवडत नाही अन् विहिरीत...
दरम्यान, नवरा आणि बायको हे संसाराच्या गाड्याची दोन्ही चाकं आहेत. त्यापैकी एखाद्या जरी चाकास काही झाल्यास संसार मोडकळीस येतो. याचमुळे संसारात सर्व काही होत्याचं नव्हतं होऊन जातं. यामुळे संसार वाचवायचा असेल तर दोन्ही चाकं मजबूत असावीत असं बोललं जातं.