आई दीड महिने घराबाहेर... मुलगी घरी एकटी असताना वडिलांनीच बलात्कार अन् पीडिता आठ आठवड्यांची गर्भवती...
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एका 40 वर्षीय वडिलांनी आपल्याच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांनीच केला आपल्या मुलीवर बलात्कार...

पीडिता आठ आठवड्यांची गर्भवती राहिली अन्...
Rape Case: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वडील आणि मुलीच्या नात्याला लाज आणणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 40 वर्षीय वडिलांनी आपल्याच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर वडिलांच्या या घृणास्पद कृत्यामुळे पीडिता गरोदर राहिली. मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला. संबंधित घटना गंगापुर पोलीस स्टेशन परिसरातील शिवाजीनगर येथील असल्याची माहिती आहे.
पीडितेच्या पोटात दुखू लागलं...
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. गंगापुर पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केली असून तो मूळ बिहारचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या, तो गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीनगर येथे राहत असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या पोटात खूप दुखत असल्यामुळे तिच्या आईने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पीडितेची तपासणी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली.
हे ही वाचा: "सून पुरुषासारखी दिसते..." सासूचे 'ते' टोमणे अन् पतीने दिला तलाक! नंतर घरात घेण्याच्या बदल्यात केली 'ती' मागणी
आठ आठवड्यांची गर्भवती
रुग्णालयात पीडितेची तपासणी केल्यानंतर ती आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर, गंगापुर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून, गंगापुर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर, पोलिसांनी याबद्दल खोल तपास केला असता पीडितेची आई मागील दीड महिन्यांपासून घरी नसल्याचं समोर आलं.
हे ही वाचा: विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध! पतीला कळालं अन्... प्रियकराने गळा चिरून स्वत:ला संपवलं आणि नंतर...
वडिलांची डीएनए टेस्ट...
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात आरोपी वडिलांची डीएनए टेस्ट केली. त्यानंतर, तर डॉक्टरांनी सांगितले की, पीडित मुलीसोबत तिच्या वडिलांनी केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे ती आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर गंगापूर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती आहे.