विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध! पतीला कळालं अन्... प्रियकराने गळा चिरून स्वत:ला संपवलं आणि नंतर...

अहमदाबादच्या बावला परिसरातून एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर एक विवाहित महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध! पतीला कळालं अन्...
विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध! पतीला कळालं अन्...(फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेसोबत तरुणाचे प्रेमसंबंध

point

प्रियकराने गळा चिरून स्वत:ला संपवलं आणि नंतर...

point

नेमकं काय घडलं?

Crime News: अहमदाबादच्या बावला परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर एक विवाहित महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी तरुणाकडून पैसे आणि दागिने उकळले आणि नंतर त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे पीडित तरुणाने या भयानक पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मृताचं नाव गोविंद सिंग असून तो आणंद जिल्ह्यातील वचला गावाचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. गोविंद मागील बऱ्याच दिवसांपासून कुटुंबियांना काहीच न सांगता बावला येथे राहत होता. 10 ऑगस्ट पर्यंत त्याच्याबद्दल काहीच सुगावा लागला नाही. त्यानंतर, पोलिसांना त्याचा मृतदेह बावला येथील एका हॉटेलच्या छतावर आढळला. पीडित तरुणाने ब्लेडच्या मदतीने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. 

विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध 

पोलिसांच्या FIR नुसार, गोविंद बऱ्याच काळापासून एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंधात होता. संबंधित महिलेचं जवळपास पाच वर्षांपूर्वी दयाशंकर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. मात्र, महिलेचे तिच्या लग्नाच्या आधीपासूनच गोविंदसोबत संबंध होते. लग्नानंतर सुद्धा, गोविंद आणि तिच्यातील नातं तसंच राहिलं. 

हे ही वाचा: बहिणीचे प्रेमसंबंध कळताच भाऊ संतापला! प्रियकराला दांडक्याने बेदम मारहाण पण शेवटी... मुंबईतील धक्कादायक घटना

पैशांच्या कारणावरून तणाव...

प्रकरणातील आरोपी महिला आणि तिच्या पतीने गोविंदकडून पैसे आणि दागिने घेतले होते. त्यांनी पीडित तरुणातडून जवळपास 1.67 लाख रुपये उधार घेतले होते आणि ते त्याला परत सुद्धा केले नाहीत. इतकेच नव्हे, तर आरोपींनी तरुणाकडे आणखी पैशांची मागणी केली आणि त्याला धमकवण्यास सुरूवात केली. हा दबाव आणि मानसिक शोषण गोविंद सहन करू शकला नाही आणि अखेर त्याने आत्महत्या केली.

हे ही वाचा:  बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

पोलिसांची कारवाई

बावला पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिला आणि तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल (Abetment to Suicide) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात प्रकरणासंबंधी आणखी तथ्ये समोर येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp