"बागेत चल नाहीतर व्हिडीओ व्हायरल..." तरुणांनी मुलीसोबत केलं अश्लील कृत्य अन् पीडितेच्या मित्राला सुद्धा...
एका अल्पवयीन पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत काही तरुणांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणांनी मुलीसोबत केलं अश्लील कृत्य

तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन् बागेतच...
Crime News: बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. मोतिहारी जिल्ह्यातील ढाका पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत काही तरुणांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासोबतच, पीडितेच्या मित्राला सुद्धा मारहाण करण्यात आली. या प्रकरणात, अल्पवयीन पीडितेने तीन मुलांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला.
पीडितेने पोलिसांना दिली माहिती
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपी नवीन तिवारी आणि अभिषेक कुमार या दोघांना अटक केली असल्याची माहिती आहे. पीडितेने पोलिसात तक्रार दाखल करताना सांगितलं की ती आणि तिचा मित्र घरापासून काही अंतरावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली होती.
हे ही वाचा: आई दीड महिने घराबाहेर... मुलगी घरी एकटी असताना वडिलांनीच बलात्कार अन् पीडिता आठ आठवड्यांची गर्भवती...
तिथून घरी परत येत असताना तिथल्या एका बागेजवळ तीन तरुण मद्यपान करत असल्याचं पीडितेनं पाहिलं. त्यावेळी त्या तिन्ही तरुणांनी पीडिता आणि तिच्या मित्राला घेरलं आणि तिला बागेत चल, नाहीतर तुमचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देत होते. त्या दोघांनी या सगळ्याला विरोध केला असता तिघांनी पीडितेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: "सून पुरुषासारखी दिसते..." सासूचे 'ते' टोमणे अन् पतीने दिला तलाक! नंतर घरात घेण्याच्या बदल्यात केली 'ती' मागणी
घटनास्थळी पोहचून आरोपींना घेतलं ताब्यात...
आरोपी पीडितेचा हात पकडून तिला बळजबरीने बागेत नेण्याचा प्रयत्न करत होता. मुलीच्या मित्राने विरोध केला असता त्याला सुद्धा बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी, तिथल्या स्थानिकांनी पीडिता आणि तिच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते आरोपींच्या तावडीतून बाहेर पडू शकले. दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंबंधी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन आरोपींना अटक केली. त्यातील एक आरोपी पिन्टू कुमार तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी या प्रकरणात, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.