पुणे: 16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा गच्चीवरच करायचे अभ्यास, नंतर खोलीत नेलं अन्...पीडिता राहिली गर्भवती
Pune Crime : ग्रामीण पुण्यातील हवाई तालुक्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. लोणी काळभोर परिसरात इयत्ता 11 वीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर एका 17 वर्षीय तरुणाने अनेकदा लैंगिक शोषण केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ग्रामीण पुण्यातील हवाई तालुक्यातील धक्कादायक प्रकरण

11 वीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर 17 वर्षीय तरुणाकडून लैंगिक शिक्षण

मुलगी झाली गर्भवती

नेमकं काय झालं?
Pune Crime : ग्रामीण पुण्यातील हवाई तालुक्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. लोणी काळभोर परिसरात इयत्ता 11 वीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर एका 17 वर्षीय तरुणाने अनेकदा लैंगिक शोषण केलं. संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानं अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याचं समजतंय. या घटनेनं लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसरातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हे ही वाचा : मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचं थैमान, तांत्रिक बिघाडामुळे मनोरेल बंद, 'एवढे' प्रवासी अडकले
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच ठिकाणी राहतात. ते शाळेत जाताना आणि येताना दोघेही सोबत असायचे. ते अभ्यास करण्यासाठी दोघेही एकत्र बसायचे. त्यांच्यात जवळीकता आणखी वाढू लागली होती. त्यानंतर त्यांच्यात आणखी जवळीकता वाढू लागल्याने ते दोघेही छतावर अभ्यास करायचे. तेव्हा आरोपी बिल्डिंगच्या छतावर अभ्यास करायचे. त्यानंतर त्याने पीडितेला एका खोलीत नेलं आणि तिच्यासोबत लैंगिक शोषण केलं. ही घटना सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत सुरुच होती.
पीडिता सात महिन्यांची गर्भवती
काही दिवसांत मुलीच्या तब्येतीत बदल झाल्याने कुटुंबियांना संशय आला. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती राहिल्याचे आढळून आले. या प्रकरणाचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे. यानंतर पीडितेच्या पालकांना मोठा धक्का बसला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईस सुरुवात केली. अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. संबंधित प्रकरणात पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला.
हे ही वाचा : ऐकावं ते नवलंच! साताऱ्यात महिलेला सात बाळ, एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म, डॉक्टरही चक्रावले
सध्या शिक्षण घेण्याच्या वयात मुलं आणि मुली सोशल मीडियाचा अयोग्य वापर करतात. मोबाईल फोन, सोशल मीडियाद्वारे भेटीगाठी करत नको तेच चाळे करतात. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी जवळीकता किती गंभीर आहे हे याचं धक्कादायक उदाहरण आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे.