2023 मध्ये बनली 'मिस इंटरनॅशनल इंडिया' अन् आता भारतीय सैन्यात दाखल! पुण्याची कशिश मेथवानी आहे तरी कोण?
2023 मध्ये मिस इंटरनॅशनल इंडिया'चा किताब जिंकलेली कशिश मेथवानीने मॉडलिंग आणि अभिनय यांसारख्या आकर्षक संधी बाजूला ठेवून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मिस इंटरनेशनल इंडिया' आता भारतीय सैन्यात दाखल!

पुण्याची कशिश मेथवानी आहे तरी कोण?
पुणे: यशाच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी जिद्द आणि मेहनतीमुळे आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. पुण्यातील कशिश मेथवानीने हे सिद्ध करून दाखवलं आहे. 2023 मध्ये मिस इंटरनॅशनल इंडिया'चा किताब जिंकलेल्या कशिश मेथवानीने मॉडलिंग आणि अभिनय यांसारख्या आकर्षक संधी बाजूला ठेवून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून आर्मीचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिला आता भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण म्हणजेच एअर डिफेन्स युनिटमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे.
आई-वडिलांचा पूर्णपणे पाठिंबा
कशिशचे वडील माजी शास्त्रज्ञ असून नंतर त्यांनी डायरेक्टरेट जनरल ऑफ क्वालिटी अश्योरेन्समध्ये डिफेन्स सिव्हिलिअन म्हणून काम केलं. तिची आई आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहे. कशिशच्या कुटुंबातील कोणीही यापूर्वी सैन्यात कार्यरत नव्हतं. पण, तरीही कशिशच्या आई-वडिलांनी तिच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला.
हे ही वाचा: Personal Finance: टाटाच्या गाड्या तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत स्वस्त, एवढे पैसे कसे होणार कमी?
कशिशचं अष्टपैलू व्यक्तीमत्त्व
कशिशने बायोटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली असून तिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूमधून थेसीस देखील केलं आहे. खरंतर, कशिशला हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडीची ऑफर सुद्धा मिळाली होती, परंतु तिने देशसेवेचा मार्ग निवडला. कॉलेजच्या काळात ती नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये सामील झाली. 'एनसीसी'मुळे तिचा सैन्यात दाखल होण्याचा विचार आणखी दृढ झाला. कशिश एक भरतनाट्यम नृत्यांगना, तबला वादक, क्विझर आणि वादक सुद्धा आहे. तिने 'क्रिटिकल कॉज' नावाचं एक एनजीओ देखील सुरू केलं आहे. ओटीएमध्ये तिने बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि हँडबॉलमध्ये अकादमीचे प्रतिनिधित्व केलं आणि मुख्य स्पर्धांमध्ये कॉमेन्ट्री म्हणजे समालोचक व्हॉइस आणि सूत्रसंचालक म्हणून काम केलं.
हे ही वाचा: ZP President Reservation: पाहा तुमच्या जिल्ह्यात ZP अध्यक्ष कोण असेल, यादीच आली समोर... जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!
पंतप्रधानांकडून 'ऑल इंडिया बेस्ट कॅडेट' पुरस्काराने सन्मानित...
OTA मध्ये 11 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणादरम्यान कशिशने शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने 'आर्मी एअर डिफेन्स मेडल'सह बरेच पुरस्कार जिंकले. मार्च महिन्यात तिला 'शीख लाईट इन्फंट्री रेजिमेंट मेडल', 'ड्रिल अँड डिसिप्लिन बॅज' आणि 'कमान्डन्ट पेन'ने सन्मानित करण्यात आलं. प्रशिक्षणादरम्यान, तिने 'बटालियन अंडर ऑफिसर' आणि नंतर 'अकादमी अंडर ऑफिसर' अशी अॅकॅडमीतील सर्वोच्च नेतृत्व पदे भूषवली. पेजेन्ट्री हा तिच्यासाठी फक्त एक छंद होता, परंतु एनसीसीचा अनुभव आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधानांकडून 'ऑल इंडिया बेस्ट कॅडेट पुरस्कार' मिळणे हा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं कशिशने सांगितलं.