मुलांचा गळा दाबून पाण्यात बुडवल, नंतर पतीनेही संपवलं आयुष्य पण पत्नी मात्र... हादरवून टाकेल अशी घटना
एका जोडप्याने त्यांच्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलांचा गळा दाबून पाण्यात बुडवलं अन् स्वत:चा गळफास घेत...

टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं कारण काय?
Suicide and Murder Case: नैराश्य आणि आर्थिक संकटासारख्या परिस्थितीत माणूस टोकाच्या थराला जात असल्याच्या घटना पाहायला मिळतात. कर्नाटकातील बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होसकोटे तालुक्यातील गोनाकनहल्ली गावातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने त्यांच्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती आणि दोन्ही मुलं मरण पावली, तसेच सुदैवाने पत्नी वाचली. संबंधित महिला आता पोलीस कोठडीत असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 32 वर्षीय शिवू आणि त्याची पत्नी मंजुळा यांच्यात वारंवार वाद होत होते. काही वर्षांपूर्वी शिवूचा अपघात झाला आणि त्यानंतर तो बराच वेळ घरीच असायचा. यादरम्यान, तो अनेकदा आपल्या पत्नीवर संशय घ्यायचा. शिवू कोणतंही काम करत नसल्याने कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता.
मुलांना मारून नंतर स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय
या संकटातून सुटका मिळवण्यासाठी या जोडप्याने काही काळापूर्वी आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु त्यांना त्यांच्या मुलांना मागे सोडायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आधी मुलांना मारण्याचा आणि नंतर स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेच्या दिवशी दुपारी 2 वाजताच्या सुमारास या जोडप्यानं दारू प्यायल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी आधी त्यांची 11 वर्षांची मुलगी चंद्रकलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिचं डोकं पाण्यात बुडवलं.
हे ही वाचा: वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्राच्या घरी नेलं अन् 12 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार...
यानंतर तिने तिचा सात वर्षांचा मुलगा उदय सूर्यासोबतही तेच कृत्य केलं. मुलांना मारल्यानंतर मंजुळाने स्वतः गळफास घेण्याचा प्रयत्न केला. शिवू आजारी होता आणि त्याला उलट्या होत होत्या. अशातच, त्याने आधी मंजुळाला जवळच्या दुकानातून जेवण आणण्यास सांगितलं. मंजुळा परत आल्यानंतर शिवूने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं तिला आढळलं.
हे ही वाचा: शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं प्रेम, बनावट सोशल मीडिया अकाउंट... अचानक दुसऱ्या शिक्षिकेची एन्ट्री अन्..
आर्थिक दबावामुळे टोकाचं पाऊल
पोलिसांनी मंजुळाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात हे जोडपं मानसिकदृष्ट्या अस्थिर असून आर्थिक दबावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं असे दिसून आलं. या घटनेमुळे स्थानिक समुदायाला खूप धक्का बसला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि मंजुळाविरुद्ध खून आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.