ऐकावं ते नवलंच! साताऱ्यात महिलेला सात बाळ, एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म, डॉक्टरही चक्रावले

Satara Baby Born : आईच्या पोटी एक दोन नव्हे तर तब्बल सात बाळांनी जन्म घेतला आहे. या घटनेनं सातारा जिल्ह्यातील रुग्णालयातील कर्मचारी थक्क झाले आहेत.

ADVERTISEMENT

Satara Baby Born
Satara Baby Born
social share
google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यात आश्चर्यकारक घटना

point

एकाच वेळी चार बाळांना जन्म

point

ऐकावं ते नवलंच

Satara Baby Born : एखादी महिला एका वेळी अधिकाधिक दोन बाळांना जन्म देते. ती बाळं जुळी असतात. पण, साताऱ्यात एक आश्चर्यकारक घटना उघजडकीस आली आहे. आईच्या पोटी एक दोन नव्हे तर तब्बल सात बाळांनी जन्म घेतला आहे. या घटनेनं सातारा जिल्ह्यातील एका रुग्णालयातील कर्मचारी थक्क झाले आहेत. ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील माहेरीतील आहे. या ठिकाणी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय 27) तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला होता. 

हे ही वाचा : 'या' तारखेला बुध ग्रहाचे संक्रमण होणार, काही राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

आईच्या कुशीत सात बाळ विसावणार

आता याच काजल खाकुर्डियाच्या कुशीत तब्बल सात बाळं विसावणार आहेत. तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला, त्यातील तीन मुली आहेत आणि एक मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या कुशीत एकूण सात बाळं आहेत. 

बाळ आणि आई अगदी ठणठणीत

दरम्यान महिला ही गुजरातमधील मूळ रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. सासवडमध्ये गवंडी कामगार म्हणून काम करणाऱ्या विकास खुर्डियाच्या यांच्या घरी सात बाळ असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शस्त्रक्रिया करून बाळ आणि आई सर्वजण अगदी ठणठणीत आहेत. खरं ते हे या जगातील आठवं आश्चर्य म्हटलं तरीरी वावगं ठरणार नाही. 

हे ही वाचा : मुलांचा गळा दाबून पाण्यात बुडवलं, नंतर पतीनेही संपवलं आयुष्य पण पत्नी मात्र... हादरवून टाकेल अशी घटना

या यशस्वीपूर्ण झालेल्या डिलिव्हरीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आश्चर्य बघायला मिळालं.

हे वाचलं का?

    follow whatsapp