'या' तारखेला बुध ग्रहाचे संक्रमण होणार, काही राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार
Astrology : ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो, नेमकं काय सांगतं राशीभविष्य जाणून घ्या.
ADVERTISEMENT

1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बुध ग्रहाने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला. त्यानंतर, 15 सप्टेंबर रोजी तो आपल्या उच्च राशी कन्या राशीत येईल. काही राशीच्या लोकांना बुध ग्रह हा आपल्या उच्च राशीत गेल्याने चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

2/5
या संक्रमणाचा काही राशींना मोठा फायदा निर्माण होणार आहे. ज्यात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध सुधारेल असे अनेक संकेत दिसून येतात. हा बदल जीवनाला नवीन दिशा देणारा बदल आहे.

3/5
मिथून राशी :
मिथून राशीतील लोकांसाठी बुध ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश फायदेशीर आहे. यामुळे प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातून चांगला आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवन चांगलं आनंददायी राहणार आहे.

4/5
तूळ राशी :
तूळ राशीतील लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. करिअरमध्ये नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपली आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.

5/5
मकर राशी :
बुध ग्रह मकर राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे जो तुमचे भाग्य उजळवेल. या काळात, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होईल.