खेडकर कुटुंबाचा आणखी एक प्रताप, घराभोवती आढळला महत्त्वाचा पुरावा, पोलिसांनी शोध घेताच पूजाच्या आईनं घातली हुज्जत

pooja khedkar : पूजा खेडकरच्या आईने नुकताच एक नवा प्रताप केला आहे. पूजाच्या आईने एका मिक्सर ट्रक चालकाचं अपहरण करत त्याला डांबून ठेवलं.

ADVERTISEMENT

pooja khedkar
pooja khedkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर चर्चेत

point

पूजा खेडकरच्या आईने ट्राक ड्रायव्हरचं केलं अपहरण

point

नंतर पोलिसांशीच घातली हुज्जत

point

नेमकं काय घडलं?

Pooja Khedkar Pune : निलंबित झालेली आणि सदैव वादाच्या भोवऱ्यात असलेली आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर ही चर्चेचा विषय होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पूजा खेडकर आणि तिची आई चर्चेत आली आहे. पूजा खेडकरच्या आईने नुकताच एक नवा प्रताप केला आहे. पूजाच्या आईने एका मिक्सर ट्रक चालकाचं अपहरण करत त्याला डांबून ठेवलं. पोलीस तपासासाठी घरी आले असता, सहकार्य न करता आरोपींना पळून जाण्यास पूजा खेडकरच्या आईनेच मदत केली होती. पूजा खेडेकरच्या आईचं नाव मनोरमा खेडेकर असल्याचं तपासातून समोर आलं आहे.  

हे ही वाचा : पुणे: 16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा गच्चीवरच करायचे अभ्यास, नंतर खोलीत नेलं अन्...पीडिता राहिली गर्भवती

एकूण घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक ड्रायव्हरला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि ट्रक मालक धोंडीराम ढंगरे यांनी रबाळे पौलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणातील दोन आरोपी हे आयएएस पूजा खेडकरच्याच बंगल्यात आढळून आले होते. तेव्हा पूजा खेडकरच्या आईने पोलिसांना सहकार्य केला नसल्याने पोलिसांना पूजाच्या आईवर अधिक संशय बळावला.  

दरम्यान, या प्रकरणात पूजा खेडकर यांच्या आईवर कलम 221, 238 आणि 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अज्ञातांनी एका ट्रक चालकाच्या हेल्परचे अपहरण करत मनोरमा खेडेकर यांच्या घरी आणल्याचा गंभीर आरोप केला. तपासादरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेतला. त्यानंतर खेडकर यांच्या घरी धाव घेतली असता, घटनेचा भांडाफोड झाला. 

पूजाच्या आईचे पोलिसांशी गैरवर्तन

मिक्सर ट्रकचालक प्रल्हाद कुमार (वय 22) हा मुलूंड ते ऐरोलीमार्गे मिक्सर ट्रक घेऊन जात होता. तेव्हा एका चार चाकी वाहनाला हलकी धडक देत कारमधील दोघांनी त्याला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवत अपहरण केलं. यानंतर संबंधित प्रकरणात पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अपहरण करताना जी कार होती ती कार पूजा खेडकरच्या चतृश्रृंगी हद्दीतील घरी आढळली होती. तेव्हा पूजाच्या आईचे पोलिसांशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. 

हे ही वाचा : पोटच्या मुलांनीच आईचा गळा दाबत संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?

संबंधित अपहरणाच्या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना सहकार्य न करता उर्मट भाषा वापरून हुज्जत घातली. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. 


हे वाचलं का?

    follow whatsapp