राज्यातील कोकण भागासह 'या' 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी, कसं असेल राज्यातील हवामान?
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 13 ते 18 सप्टेंबर रोजी या कालावधीत काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभाग

काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 13 ते 18 सप्टेंबर रोजी या कालावधीत काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्हे, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर एन्काऊंटरच...' पोलिसांच्या फोनने हातभर... अन् थेट सरेंडर
कोकण विभाग :
कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिकच्या घाटमाथ्यावरील परिसरात हवामान विभागाने हलक्या स्वरुपाच्या मान्सूनचा इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाने अहिल्यानगरमध्ये 30-40 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे. या भागातील पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा आणि सांगलीत हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.