12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला, आता तिच्याच बहिणीसोबत अनैतिक संबंध.. वासनांध पतीसोबत पत्नीने केला खतरनाक कांड
Crime News: एका महिलेने तिच्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पतीचे मेव्हणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर पत्नीने हे कृत्य केलं असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT

झाशी (उ. प्रदेश): उत्तर प्रदेशमधील झाशीच्या ओम प्रकाश रायकवारचा मृतदेह गेल्या रविवारी बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात सापडला. यावेळी हा मृतदेह रक्ताने माखलेला होता. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी मृताची ओळख पटवून हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या. प्रत्यक्षात, ओम प्रकाशची हत्या इतर कोणीही नाही तर त्याच्या स्वतःच्या पत्नी, मेव्हणी आणि मेव्हणीच्या प्रियकराने केली असल्याचं तपासात उघड झालं. ज्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली.
या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब अशी की, ओम प्रकाश याने 12 वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. तो फक्त 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला होता. पण त्याची पत्नी, मेहुणी आणि मेहुणीच्या प्रियकराने त्याची हत्या केली. या हत्येचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
हे ही वाचा>> पत्नी छतावर तिच्या बॉयफ्रेंडच्या मिठीत, पतीनं रंगेहाथ पकडत धारदार शस्त्राने मुंडकं छाटलं.. आरोपी मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात..
ओम प्रकाशसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ओम प्रकाश रायकवार हा मूळचा झाशीतील रहिवासी होता. 12 वर्षांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील निवारी येथे राहणाऱ्या जयकुंवर नावाच्या तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. नंतर ते दोघेही दिल्लीला निघून गेले. पण साधारण 3 वर्षांपूर्वी तो पुन्हा झाशीला राहण्यासाठी आला होता.
झाशीमध्ये आपल्या घराजवळच असलेल्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये तो काम करत होता. यावेळी त्याची पत्नी जयकुंवर आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत राहत होती.