मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?

मुंबई तक

महाराष्ट्र सरकारकडून मुंबई आणि लगतच्या मेट्रोपॉलिटन क्षेत्रात (MMR) बाईक टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी...
आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता मुंबईत धावणार 'या' बाईक टॅक्सी...

point

किती असेल भाडं?

Mumbai News: मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई आणि लगतच्या मेट्रोपॉलिटन क्षेत्रात (MMR) बाईक टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील राज्य परिवहन प्राधिकरणाने अॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला, उबर आणि रॅपिडोच्या मूळ कंपन्यांना मुंबई महानगर प्रदेशात बाईक टॅक्सी सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं लायनान्स देण्याची मान्यता दिली आहे. 

यासोबतच, प्राधिकरणाने या सेवेचं भाडं देखील निश्चित केलं आहे. सुमारे 1.5 किमी प्रवासासाठी किमान भाडे 15 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही यासंदर्भात माहिती दिली. बाईक टॅक्सीसाठी हे नियन मागील काही दिवसांतच तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:  अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार! 2 वर्षांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी...

किती भाडं निश्चित करण्यात आलं? 

एसटीए बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांना 'महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025' मध्ये निर्धारित केलेल्या नियमांनुसार काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईचे हे नियम संपूर्ण राज्यात लागू केले जातील. प्रवाशांना या सेवेत प्रति किलोमीटर 10.27 रुपये द्यावे लागतील. आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील एसटीएने 18 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बाइक टॅक्सीचं भाडं मंजूर केलं आणि ते राज्यभर लागू होणार असल्याची माहिती आहे. परिवहन प्राधिकरणाने भाडं निश्चित करण्यासाठी खटुआ पॅनेल फॉर्म्युला वापरला आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सींसाठी दर मोजण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

हे ही वाचा: Govt Job: आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँक ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी... लाखाच्या घरात मिळेल पगार अन्...

मुंबई महानगर प्रदेशात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागाला 4 अर्ज प्राप्त झाले, परंतु त्यांनी फक्त 3 कंपन्यांना तात्पुरते परवाने म्हणजेच लायसन्स मंजूर केलं. बाईक टॅक्सी सेवा चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे एसटीएने 'स्मार्ट-राइड'चा अर्ज नाकारला. प्राधिकरणाची एक वर्षानंतर बाईक टॅक्सीच्या भाड्यांचा आढावा घेण्याची योजना आहे. प्रवाशांना काळ्या-पिवळ्या रंगाच्या टॅक्सींसाठी किमान 31 रुपये आणि ऑटोरिक्षासाठी 26 रुपये भाडं द्यावं लागेल. जानेवारी 2023 मध्ये, सरकारने अ‍ॅप-आधारित सेवांसाठी खाजगी किंवा बिगर-वाहतूक श्रेणीतील दुचाकी वाहनांचा वापर करण्यास बंदी घालणारा सरकारी आदेश जारी केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp