Govt Job: आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँक ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी... लाखाच्या घरात मिळेल पगार अन्...
भारतीय स्टेट बँक (SBI) कडून 'मॅनेजर' पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्याही परीक्षेशिवाय बँक ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी

पगार तर लाखोंच्या घरात...
Govt Job: भारतीय स्टेट बँक (SBI) कडून 'मॅनेजर' पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकिंक आणि फायनान्स क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
'या' तारखेपर्यंत करा अर्ज
SBI मध्ये मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी बँकेच्या अधिकृत वेबसाइट जाऊन लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन करावं लागेल. या भरतीच्या माध्यमातून एकूण 122 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्यूएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे MBA (फायनान्स), MMS (फायनान्स), PGDBA, PGDBM, CFA, CA किंवा ICWA ची डिग्री असणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार! 'ते' फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्... पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये उमेदवारांना मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल-III मध्ये समाविष्ट केलं जाईल. तसेच, या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना 85,920 रुपये ते 1,05,280 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. यासोबतच, 6 महिन्यांचा प्रोबेशन पीरियड सुद्धा असेल.