विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार! 'ते' फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्... पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
शिक्षकाकडून सतत लैंगिक शोषण आणि खाजगी फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांना वैतागून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ट्यूशन टीचरकडून विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार!

शिक्षकाने दिली 'ते' फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
Crime News: बिहारमध्ये शिक्षकाकडून सतत लैंगिक शोषण आणि खाजगी फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांना वैतागून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मंगुर जिल्ह्यातील आदर्शनगर पोलीस स्टेशन परिसरात एका खाजगी ट्यूशन शिक्षकाने त्याच्या विद्यार्थीनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर त्याने तिचे खाजगी फोटोज तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. याच मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. रविवारी उपचारादरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप
पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्या ट्यूशन टीचरवर पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचा तसेच मुलीचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकासोबत आणखी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात आहे. घटनेतील मृत तरुणीचं वय 18 वर्षे असून ती बीए पार्ट 1 ची विद्यार्थीनी असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: पीडिता मैत्रिणींसोबत शेतात गेली अन् दाजीने पाहिलं, नंतर निर्जनस्थळी नेत मेहुणीवर सामूहिक बलात्कार अन्...
पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताना सांगितलं की मागील सहा महिन्यांपासून आरोपी शिक्षक पीडितेवर शारीरिक अत्याचार करत आहे. तिच्या घरच्यांना याबद्दल कळताच त्यांनी तिचं ट्यूशनला जाणंच बंद केलं. त्यानंतर, आरोपी शिक्षकाने पीडितेला ट्यूशनला पाठवण्यासाठी तिच्या कुटुंबियांवर दबाव आणण्यास सुरूवात केली. परंतु, पीडितेने तिच्या शिक्षकाच्या वाईट कृत्याबद्दल कुटुंबियांना काहीच सांगितलं नाही.
हे ही वाचा: महिलेनं 15 वर्षांच्या मुलाला दिली 'ती' धमकी! नंतर मंदिरात नेलं अन् थेट लग्नच... नेमकं प्रकरण काय?
फोनवरून फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
काही दिवसांपासून, आरोपी शिक्षक पीडितेला फोन करून तिला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचं सांगितलं जात आहे. याच त्रासाला कंटाळून पीडितेने 13 सप्टेंबर रोजी आपल्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. घराच्या छतावरून उडी मारल्यानंतर, पीडिता गंभीर पद्धतीने जखमी झाली. कुटुंबियांनी पीडितेला आधी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला पाटणा रेफर केलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यात व्हिडीओ आणि फोटोसह बरेच पुरावे सापडले. आपली मुलगी आरोपी शिक्षकाच्या ब्लॅकमेलिंगची शिकार झाल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं.