'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर एन्काऊंटरच...' पोलिसांच्या फोनने हातभर... अन् थेट सरेंडर
pune crime : शनिवारी पुणे पोलिसांनी आरोपी कृष्णासाठी एक मेसेज पाठवला होता. त्याच मेसेजनंतर कृष्णा आंदेकर हा थेटच पोलिसांना शरण आला. पोलिसांनी कृष्णाला एन्काऊंटरची वॉर्निंग दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आयुष आंदेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट

'.. तर तुझा एन्काऊंटर करेल', नेमकं काय म्हणाले पोलीस?
Pune Crime : पुण्यात काही वर्षांपासून गुन्हेगारीचं सत्र वाढू लागलं आहे. याच पुण्यात आता गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या एक दिवस आधीच आयुष आंदेकरवर गोळीबार करत त्याला संपवलं. त्यानंतर याच प्रकरणात आता नवनवीन ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत. आयुष आंदेकरचा मारेकरी खुंकार कंस मामा स्वत: पोलिसांना शरण गेला आहे. त्याच्यासोबत इतरही काही आरोपी समर्थ पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. याच प्रकरणात शनिवारी पुणे पोलिसांनी आरोपी कृष्णासाठी एक मेसेज पाठवला होता. त्याच मेसेजनंतर कृष्णा आंदेकर हा थेटच पोलिसांना शरण आला. पोलिसांनी कृष्णाला एन्काऊंटरची वॉर्निंग दिली होती.
हे ही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्श शिंदे यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली
कृष्णा आंदेकर समर्थ पोलीस ठाण्यात सरेंडर
त्यानंतर आता कृष्णा आंदेकर समर्थ पोलीस ठाण्यात सरेंडर झाला आहे. कृष्णा हा आंदेकर हा आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा तो मुलगा आहे. बंडू आंदेकर यांच्याकडून पोलिसांनी थेट वॉर्निंग देण्यात आली होती. त्यानंतर आता कृष्णा सरेंडर झाला.
कृष्णा आंदेकर हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत पळ काढत होता. पण तो स्वत: पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला होता. याचप्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. बंडू आंदेकरने न्यायालयात सांगितलं की, कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर त्यांचा एन्काऊंटर करू, अशी पोलिसांनी धमकी दिल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा : 'गर्दीचा फायदा घेत मला...' 62 वर्षीय वृद्धाने पीडितेला नको तिथंच हात लावत... दादर स्थानकावर नेमकं काय घडलं?
सर्व आरोपी अटकेत
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील एकूण 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपींमध्ये बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा देखील या प्रकरणात समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाठोळे आणि सुजल मिरगू,अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांचा यामध्ये समावेश होता.