पत्नी छतावर तिच्या बॉयफ्रेंडच्या मिठीत, पतीनं रंगेहाथ पकडत धारदार शस्त्राने मुंडकं छाटलं.. आरोपी मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात..
Extramarital affairs : अनैतिक संबंधांमुळे अनेकांचे संसार मोडले गेले आहेत. याच अनैतिक संबंधातून पतीने आपल्या पत्नीला आणि पत्नीच्या बॉयफ्रेंडचा खून केला, त्यानंतर त्यांचे मुंडकं घेऊन पती पोलीस ठाण्यात गेला. हा सर्व प्रकार वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंधाच्या घटनांमध्ये वाढ

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीसह बॉयफ्रेंडचं मुंडकं छाटलं

नेमकं काय घडलं?
Extramarital affairs : देशभरात अनैतिक संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या अनैतिक संबंधांमुळे अनेकांचे संसार मोडले गेले आहेत. याच संबंधातून पतीने आपल्याच पत्नीला आणि पत्नीच्या बॉयफ्रेंडचा खून केला, त्यानंतर त्यांचे मुंडकं घेऊन पती पोलीस ठाण्यात गेला. हा सर्व प्रकार वाचून तुम्हीही थक्क व्हाल. दरम्यान, हे प्रकरण तमिळनाडूतील कल्लाकुरिची येथील आहे.
हे ही वाचा : 'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर एन्काऊंटरच...' पोलिसांच्या फोनने हातभर... अन् थेट सरेंडर
पत्नीला आणि बॉयफ्रेंडला छतावर पाहिलं नंतर...
दरम्यान, या आरोपी पतीचं नाव कोलांजी असे होते. कोलांजीला असे वाटलं की, त्याची पत्नी लक्ष्मीचं परपुरूषासोबत गैरसंबंध आहेत. हेच सिद्ध करण्यासाठी कोलांजीनं डोकं लावून दोघांनाही रंगेहाथ पकडलं. कोलांजी हा एक दिवस लवकर घरी आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत छतावर पाहिलं. दोघांना एकत्र पाहून कोलांजी संतापला. त्याने जवळ ठेवलेल्या एका धारदार शस्त्राने पत्नी लक्ष्मी आणि तिचा बॉयफ्रेंड थंगाराससुवर हल्ला केला आणि दोघांचंही मुंडकं छाटलं.
पुढे नेमकं काय घडलं?
या हैवानी कृत्यानंतर त्याने आणखी एक धक्कादायक घृणास्पद पाऊल उचललं. त्यांची डोकी एका पिशवीत ठेवत दुचाकीला बांधले आणि वल्लोर मध्यवर्ती कारागृहात जाऊन तो सरेंडर झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करत मृतदेह हा ताब्यात घेतला. कोलांजी आणि लक्ष्मीला तीन मुली आहेत, ज्यात एका तरुणीचं लग्न देखील झाले आहे. याचदरम्यान, कोलांजीला अटक केल्याने त्या तीन मुलींनाही त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे. कोलांजी हा कोठडीतच आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्श शिंदे यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली
सध्या अनैतिक संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. याच अनैतिक संबंधामुळे पती-पत्नीचे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. एवढंच नाही,तर या अनैतिक संबंधामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण झाली आहे. विवाह ही संकल्पना आणि आपल्या सहजोडीदाराची किंमत कुठेतरी कमी होऊ लागल्याचं बोललं जात आहे.