14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं! आधी तिला दारू पाजली अन् नंतर पाच जणांनी मिळून...
14 वर्षीय अल्पवयीन अधी दारू पाजण्यात आली आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
14 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य...
आधी दारू पाजली अन् पाच जणांकडून बलात्कार...
Crime News: सध्या, देशात चोरी, दरोडा, खून आणि बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहारच्या खगडिया जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे 14 वर्षीय अल्पवयीन अधी दारू पाजण्यात आली आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. 12 सप्टेंबर रोजी परबत्त पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडल्याची माहिती आहे.
पीडितेला बाईकवर बसवून निर्जनस्थळी नेलं...
या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने परबत्ता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसात तक्रार करताना पीडितेच्या आईने सांगितलं की "12 सप्टेंबरच्या रात्री, शेजारच्या गावातील एका तरुणाने माझ्या मुलीला फोन करून दरवाजा उघडायला सांगितलं आणि नंतर तिला बाहेर रस्त्यावर येण्यास सांगितलं. यानंतर, माझ्या मुलीने असं करण्यास नकार दिला, पण त्याने तिला बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावलं. माझी मुलगी बाहेर गेल्यानंतर आरोपीने तिला बाईकवर बसवलं आणि जवळच्या एका धरणाच्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे आधीच 4 जण उपस्थित होते.
हे ही वाचा: अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार! 2 वर्षांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी...
आधी दारू पाजली अन् नंतर आळीपाळीने...
पीडितेच्या आईने पुढे सांगितलं की, "आरोपी तरुणांनी आधी दारूमध्ये गोळ्या मिसळून ते माझ्या मुलीला पाजलं. त्यानंतर पाचही आरोपींनी तिला धरणाखालील झुडुपात नेलं आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला." त्यानंतर पीडिता मृत झाल्याचं समजून सगळे आरोपी तिथून फरार झाले. सकाळी 5 वाजताच्या सुमारास पीडित तरुणीला शुद्ध आली आणि ती कशीबशी आपल्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर, पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद घटनेबद्दल कुटुंबियांना सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?
पीडितेच्या आईने केली तक्रार दाखल
आपल्या मुलीसोबत असं घडल्याचं कळताच पीडितेच्या आईने परबत्ता पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणासंदर्भात गुन्हा क्रमांक 348/25 नोंदवण्यात आला असून पीडितेच्या कुटुंबियांची चौकशी केली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपी तरुणांना अटक करण्यासाठी छापे टाकले जात असून पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.









