धारावी पाठोपाठ ठाण्यातही अदानी ग्रूपला मोठा विरोध, सिमेंट कपंनीचं नेमकं प्रकरण काय?
Opposition to Adani Group: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोहने गावाजवळ अदानी समूहाशी संबंधित एका मोठ्या सिमेंट प्लँटला सध्या बराच विरोध होत आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT

कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोहने गावाजवळ अंबुजा सीमेंट्स लिमिटेडने 6 एमएमटीपीए क्षमतेची स्वतंत्र सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्याचा प्रस्ताव अदानी ग्रुपकडून मांडला जात आहे. प्लॅन्टपासून नागरी वस्ती अवघ्या 10 ते 15 किलोमीटर परिघात येणारी आहे, जिथे अंदाजे 20 लाखांहून अधिक लोकसंख्या राहते. या प्लॅन्टमुळे निर्माण होणारी सिमेंट धूळ, उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे पर्यावरण, सजीव जीवन आणि स्थानिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदानी सिमेंट प्लॅन्टविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे धारावी प्रोजेक्ट पाठोपाठ अदानी समूहाला आता ठाणे जिल्ह्यात देखील विरोध होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
ठाणे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशान कोकण विभागीय माहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सारांश प्रसिद्ध केला असून, जनसुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, स्थानिक हजारो नागरिक आणि पर्यावरण प्रेमी याला तीव्र विरोध करत हरकती नोंदवत आहेत.
हे ही वाचा>> नाद करा.. पण आमचा कुठं! श्रीमंतीच्या बाबतीत अंबानी-अदाणींनी झुकेरबर्गला टाकलं पिछाडीवर
अंबुजा सीमेंट्स लिमिटेडचा हा प्रस्तावित प्लॅन्ट कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या अंबिवली, मोहने गावात उभारला जाणार आहे. एकूण 26.13 हेक्टर जागेवर हा ड्राय सिमेंट ग्राइंडिंग प्रक्रिया असलेला प्लॅन्ट बांधला जाणार आहे. प्रकल्पाची उभारण सुरू झाल्यावर कच्चा माल हाताळणी, उत्पादन आणि वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट धूळ आणि घातक वायू प्रदूषक जसे PM2.5, PM10, SO2, NO2, CO बाहेर पडतील. असे हरकती अर्ज दाखल करण्यात आले.
या बाधित होणाऱ्या क्षेत्रात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या सर्व विभागासह उल्हासनगर आणि म्हारळ -बुद्रुक शहर समाविष्ट असून, 10 किमी परिधीत अंदाजे 14.82 लाख लोकसंख्या प्रभावित होईल. प्लॅन्टपासून जवळच अनेक शाळा, रुग्णालये आहेत. या प्लॅन्टच्या 10 ते 15 किलोमीटर परिघात कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ आणि डोंबिवली मतदारसंघातील संपूर्ण परिसर व्यापला जाईल, जिथे लाखो कुटुंबे राहतात.
हे ही वाचा>> Gautam Adani : 'धारावी'नंतर 'ही' जागा अदानी खरेदी करणार?
कल्याण पूर्व-पश्चिम शहर, अंबरनाथचा ग्रामीण भाग आणि डोंबिवली शहर-ग्रामीण मधील औद्योगिक वस्ती यातील नागरिकांना जास्त धोका असणार आहे. कल्याण पूर्व अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे. हरकती नोंदविण्यासाठी आज शेवटच्या दिवस होता आतापर्यंत 1000 हून अधिक विविध सामजिक , राजकीय, कामगार, शेतकरी, यांच्या संघटनांमार्फत अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज (16 सप्टेंबर) सर्व ग्रामस्थांसमोर या प्रकरणी सुनावणी होईल.