लातूर हादरलं! वडिलांनी फिसाठी पैसे न दिल्याने लेकाची सनकली, जन्मदात्या वडिलांना लाकडाने माराहण करत संपवलं

मुंबई तक

Latur Crime : लातूर जिल्ह्यात एका तरुणाने फिसाठी जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे, खूनामागचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

latur crime
latur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने फिसाठी जन्मदात्या वडिलांचा केला खून

point

नेमकं काय घडलं?

Latur Crime : लातूर जिल्ह्यात एका तरुणाने फिसाठी जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत, पण घरातील सिलेंडरसाठी पैसे दिल्याच्या रागातून तरुणाने हैवानी कृत्य केलं आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी मंगळवारी लातूरच्या हिंपळनेर येथे घडलीय. देविदास काशीनाथ पांचाळ (वय 70) असे खून केलेल्या वडिलांचं नाव आहे. याप्रकरणी अजय देविदास (वय 24) या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 

हे ही वाचा : दिवाळीपूर्वी 'या' राशीतील लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता, काय सांगतं राशीभविष्य?

नेमकं काय घडलं? 

वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेनं हिंपळनेर हादरून गेलं आहे. सध्या गावात शोक व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता, मुलाने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरायला न दिल्याच्या रागातून हत्या केल्याचे हे धक्कादायक कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला होता.

भरतीची फी भरण्यासाठी पैसे न देता गॅस का भरला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंपळनेर येथील तरुण अजय पांचाळ याने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरण्यास पैशांची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी पैसे नसल्याचे मुलाला सांगीतले होते. त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे न देता गॅस का भरला? असा  उलट प्रश्न केला होता. त्यानंतर त्याने रागाच्या भरात वडिलांना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच वडिलांना दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आता शारदाबाई देविदास पांचाळ (वय 50) यांनी आपल्याच मुलाची चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा : 'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर एन्काऊंटरच...' पोलिसांच्या फोनने हातभर... अन् थेट सरेंडर

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली. दरम्यान, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत नमुने घेतले आणि पुढील तपास सुरु असल्याचं समजतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp