मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, UBT शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

shivajipark meenatai thackeray staue : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील प्रवेशद्वाराजवळ मीनाताई ठाकरे यांचा एक पुतळा आहे. त्याच पुतळ्यावर काही अज्ञातांनी लाल रंग फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

shivajipark meenatai thackeray staue
shivajipark meenatai thackeray staue
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात धक्कादायक प्रकार

point

मीनाताई ठाकरे पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फासटला

point

नेमकं काय घडलं?

shivajipark meenatai thackeray staue : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील प्रवेशद्वाराजवळ मीनाताई ठाकरे यांचा एक पुतळा आहे. त्याच पुतळ्यावर काही अज्ञातांनी लाल रंग फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या घटनेनं शिवाजीपार्क परिसरात आता तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी त्याच्या पुतळ्यांची साफसफाई केली. याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी घटनास्थळी दाखल घेत परिस्थिती पाहिली. अशातच आता रंग फेकणाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा : लातूर हादरलं! वडिलांनी फिसाठी पैसे न दिल्याने लेकाची सनकली, जन्मदात्या वडिलांना लाकडाने माराहण करत संपवलं

पुतळ्यावर लाल रंग फासल्यानंतर अनिल देसाई काय म्हणाले? 

या घडलेल्या एकूण कृत्यावर अनिल देसाई म्हणाले की, हे कृत्य करणाऱ्यावर कोणतेही संस्कार झालेले दिसत नाहीत. ज्यानं कोणी हे कृत्य केलं आणि रंग फेकला आहे त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जाईल. अशा प्रवृत्तीविरोधात सरकार काय करत आहेत? असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारचं काही कर्तव्य आहे की नाही? असा प्रश्न करत सरकारवरलाही सोडलं नाही. सरकारचं हे अपयश प्रत्येक ठिकाणी दिसते आहे, अशी टीका करत त्यांना सरकारला धारेवर धरलं आहे.

मुंबई खरी सुरक्षित आहे का?

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर मुंबई खरी सुरक्षित आहे का? असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सरकारचं याकडे लक्ष नाही ते नको त्याच गोष्टीवर लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले. तसेच या घटनेची माहिती त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील दिली असल्याचं म्हणाले आहेत.

हे ही वाचा : साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांना दत्तक देण्याची मागणी, बाळांच्या मावशीनेच केला धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

दरम्यान, सध्या शिवाजीपार्कात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली होती. त्यामुळे या भागांत तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. अशा समाजकंटकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp