साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांना दत्तक देण्याची मागणी, बाळांच्या मावशीनेच केला धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
satara news : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका महिलेनं आधी तीन तर नंतर चार बाळांना जन्म दिला होता. याच लहान मुलांना दत्तक देण्याबाबत मागणी धरू लागले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेनं चार बाळांना जन्म दिल्यानंतर दत्तकची मागणी

जन्मदात्या आईच्या बहिणीने दिली माहिती

नेमकं प्रकरण काय?
Satara News : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका महिलेनं आधी तीन तर नंतर चार बाळांना जन्म दिला होता. चार बाळांपैकी तीन मुली आहेत आणि एक मुलगा असल्याची माहिती समोर येत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता काही लोक याच लहान मुलांना दत्तक देण्याबाबत मागणी धरू लागले आहेत. याबाबतची माहिती जन्मदाती आई कालजची बहीण प्रियांका चिखलियाने दिली.
हे ही वाचा : लातूर हादरलं! वडिलांनी फिसाठी पैसे न दिल्याने लेकाची सनकली, जन्मदात्या वडिलांना लाकडाने माराहण करत संपवलं
बाळांना दत्तक द्यावं अशी लोकांची मागणी
काजल खाकुर्डिया या महिलेच्या कुशीत आता तब्बल सात बाळं खेळत आहेत. महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्यानंतर ती पु्न्हा आता वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहेत. या बाळांपैकी तीन मुली आणि एक मुलगा असल्याने काही लोक बाळांना दत्तक द्यावं अशी मागणी करत आहेत. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या कुशीत एकूण सात बाळं आहेत.
आई आणि बाळ शस्त्रक्रियेनंतर ठणठणीत
महिला ही गुजरातची मूळ रहिवासी असून सध्या सासवडमध्ये गवंडी कामगार म्हणून मजुरी करते. अशातच आता विकास खुर्डियाच्या घरी सात बाळ आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे महिलेची शस्त्रक्रिया करून बाळ आणि आई सर्वचजण अगदी ठणठणीत आहेत. खरं तर या जगातील हे आठवं आश्चर्य म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.
हे ही वाचा : दिवाळीपूर्वी 'या' राशीतील लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता, काय सांगतं राशीभविष्य?
या यशस्वीपूर्ण झालेल्या प्रसूतीदरम्यानच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी चार बाळांना जन्म झाल्याने जिल्हा रुग्णालयात आश्चर्य बघायला मिळालं. या घटनेची केवळ साताऱ्यातच नाही,तर राज्यभर चर्चा होताना दिसते. अशातच या बाळांना सांभाळणार कसे? त्यांचं पालनपोषण कसं करणार? असं विचारत काही लोकांनी बाळांना दत्तक घेण्याची मागणीही केली.