Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती! कोणतीही परीक्षा नाही अन्...
पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) कडून ट्रेड अप्रेन्टिसशिप पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती!

कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती...
Govt Job: टेक्निकल क्षेत्रात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) कडून ट्रेड अप्रेन्टिसशिप पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करू शकतात. उमेदवारांना powergrid.in या PGCIL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
10 वी, आयटीआय (ITI), बी.ई (B.E)/ बी. टेक (B.Tech), बीएससी (B.Sc) सारख्या संबंधित क्षेत्रात डिप्लोमाची डिग्री प्राप्त केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून किमान 18 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतासाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: "तब्बल 'इतकी' मते वगळण्याचा प्रयत्न..." राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला केलं टार्गेट, पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
आवश्यक डॉक्यूमेंट्स
- NATS/NAPS पोर्टलवरील अप्रेंटिसशिप नोंदणी क्रमांक आणि अपडेटेड प्रोफाइल
- शैक्षणिक प्रमाणपत्र आणि मार्कशीट्सची स्कॅन कॉपी
- वय दर्शवणारं प्रमाणपत्र (आधार कार्ड, पासपोर्ट सारखं दस्तावेज)
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची कॉपी
- सध्याचा पासपोर्ट साइज फोटो आणि सही
कशी होईल निवड?
या भरतीमध्ये उमेदवाराची निवड कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे, शॉर्टलिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना नंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन (DV) साठी बोलवण्यात येईल. सर्व डॉक्यूमेंट्सच्या तपासणीनंतर उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट बनवली जाईल. ज्या उमेदवारांची नावे अंतिम यादीत येतील त्यांना थेट अप्रेंटिसशिपसाठी नियुक्त केलं जाईल. अप्रेन्टिसशिप एकूण 12 महिने किंवा एक वर्षाचा कालावधीसाठी असेल.
हे ही वाचा: 4 वर्षांच्या चिमुकलीवर कर्मचाऱ्यांकडून शारीरिक अत्याचार! मुंबईतील शाळेत घडला धक्कादायक प्रकार...
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. त्यानंतर, होमपेजवरील भरतीच्या सेक्शनमध्ये जाऊन 'Apprenticeship 2025' लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर, उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मिळेल.
4. आता उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि मागितलेले डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
5. अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.