55 वर्षांच्या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध! रागाच्या भरात पत्नी नको ते करून बसली अन्... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने रविवारी (14 सप्टेंबर) रात्री एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

रागाच्या भरात पत्नी नको ते करून बसली अन्... नेमकं काय घडलं?
रागाच्या भरात पत्नी नको ते करून बसली अन्... नेमकं काय घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

55 वर्षांच्या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध!

point

पत्नीने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य...

Crime News: उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील पढुआ पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने रविवारी (14 सप्टेंबर) रात्री एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी गावाजवळील एका शेतातून संबंधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी पत्नीला सुद्धा अटक केल्याचं सांगितलं जात आहे. 

प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या 

ही घटना सदर पोलीस स्टेशन परिसरातील मजरा प्रेमनगर येथे घडली. रविवारी रात्री उशिरा गावातील रहिवाशांना 55 वर्षीय महिलेचा मृतदेह गावाजवळील एका शेतात आढळून आला. घटनेतील पीडित महिलेचं नाव झुनकी देवी असून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली. 

हे ही वाचा: पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पती संतापला! प्रियकराला दारू पाजली अन् निर्घृण हत्या... तलावात सापडला मृतदेह

गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध...

मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील रहिवासी लालबहादूर याची पत्नी इंद्रावती हिला ताब्यात घेतलं. आरोपी महिलेचा पती लालबहादूर आणि झुनकी देवी यांचे अवैध संबंध सुरू होते, असं सांगितलं जात आहे. इंद्रावतीने आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाला बऱ्याचदा विरोध केला. पण तिचा पती त्याच्या प्रेयसीला म्हणजेच झुनकीला लपुनछपून भेटायला जायचा, त्यामुळे आरोपी इंद्रावतीने पतीच्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा: खिडकीची काच तोडून घरात घुसले अन् तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य! 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांचा तपास 

प्रेमसंबंधातून घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे गावात याबद्दल बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर, मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून, लालबहादूर याची पत्नी इंद्रावतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp