खिडकीची काच तोडून घरात घुसले अन् तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य! 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
पीडिता रात्री आपल्या घरी झोपलेल्या अवस्थेत असताना आरोपी खिडकीची काच तोडून तिच्या घरात घुसले आणि तिच्यासोबत निर्घृण कृत्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आरोपी खिडकीची काच तोडून घरात घुसले अन्...

तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य!

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
Crime News: बिहारमध्ये एका तरुणीची तिच्याच घरी गळा दाबून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी (15 सप्टेंबर) आरोपी पीडितेच्या घरात घुसले आणि पीडितेचा गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली. प्रकरणातील पीडितेचं नाव तन्नू कुमारी (22) असून बी.एच्या तृतीय वर्षात शिकत होती, अशी माहिती समोर आली आहे. संबंधित घटना मुजफ्फरपुर जिल्ह्यातील मीनापुरच्या बहबल बाजारात घडल्याचं सांगितलं जात आहे.
तरुणीची गळा दाबून निर्घृण हत्या
पीडिता रात्री आपल्या घरी झोपलेल्या अवस्थेत असताना आरोपी खिडकीची काच तोडून तिच्या घरात घुसले आणि तिचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. घटनेच्या वेळी, तरुणीच्या आईने सुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण, आरोपींनी आईवर देखील हल्ला करत तिला जखमी केलं. तन्नू मूळची चंपारणच्या मधुबन पोलीस स्टेशन हद्दीतील डोलमा गावाची रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच, ती शिक्षण घेण्यासाठी मीनपुर येथे आपल्या आईसोबत भाड्याच्या घरात राहत होती.
हे ही वाचा: व्हिडीओ कॉल करून तिचे स्क्रॉनशिट काढले अन् एडिट करून अश्लील फोटो व्हायरल... नंतर ब्लॅकमेल सुद्धा...
खिडकीची काच तोडून घरात घुसले
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून यासंबंधी तीन आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या खिडकीमध्ये ग्रील नव्हते. रात्रीच्या वेळी, खिडकीची काच तोडून आरोपी पीडितेच्या घरात घुसले आणि त्यांनी तन्नूवर हल्ला केला. त्यावेळी जागीच पीडितेचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: घरात पंख्याला गळफास घेत महिलेचं टोकाचं पाऊल, पण लिव्ह-इन-पार्टनरने मृतदेहाला... मुंबईतील धक्कादायक घटना!
पोलिसांनी दिली माहिती
संबंधित घटनेची महिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पीडितेच्या घरी पोलिसांनी तपास केला आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एसकेएमसीएचला पाठवण्यात आला. पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेच्या वेळी, दोन आरोपी तरुण खिडकीची काच तोडून घरात घुसले आणि त्यांचा एक साथीदार घराबाहेर उभा होता.