घरात पंख्याला गळफास घेत महिलेचं टोकाचं पाऊल, पण लिव्ह-इन-पार्टनरने मृतदेहाला... मुंबईतील धक्कादायक घटना!
मुंबईत एका 32 वर्षीय महिलेने घराच्या छताला असलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घरात पंख्याला गळफास घेत महिलेनं केली आत्महत्या...

लिव्ह-इन-पार्टनरने मृतदेहाला...

मुंबईतील धक्कादायक घटना!
Mumbai Crime: मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील पूर्व उपनगरात एका 32 वर्षीय महिलेने घराच्या छताला असलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
पोलिसांना कळवलंच नाही...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना सोमवारी (15 सप्टेंबर) घडली. प्रकरणातील पीडित महिला ही तिच्या लिव्ह-इन-पार्टनरसोबत राहत होती. पीडितेने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तिच्या लिव्ह-इन-पार्टनरने यासंबंधी पोलिसांना माहिती देण्याऐवजी किंवा तिला रुग्णालयात नेण्याचं सोडून तिचा मृतदेह आपल्या आई-वडिलांच्या घरी घेऊन गेला. मृत महिलेचं नाव फरहाना खान असून तिने दुपारी सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला येथील डावरी नगर परिसरात आपल्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?
आपल्या आई-वडिलांच्या घरी घेऊन गेला...
मृत महिलेचा लिव्ह इन पार्टनर, अतिक रियाज मंसूरी (35) याला घटनेच्या दिवशी फरहाना घरातील सीलिंग फॅनला लटकलेली आढळली, परंतु त्याने त्यावेळी या घटनेबद्दल पोलिसांना कळवण्याऐवजी किंवा रुग्णालयात नेण्याऐवजी, तिचा मृतदेह आपल्या आई-वडिलांच्या घरी नेला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: Govt Job: आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँक ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी... लाखाच्या घरात मिळेल पगार अन्...
पीडितेच्या कुटुंबियांचा दावा
घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि प्राथमिक माहितीच्या आधारे, अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवण्यात आला. त्यानंतर, प्रकरणाच्या तपासात महिलेच्या लिव्ह-इन-पार्टनरची चौकशी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, मंसूरी हा एक गुन्हेगार असून त्याने याआधी असे गुन्हे केले आहेत, त्यामुळे आपल्या मुलीच्या हत्येत तिच्या लिव्ह-इन-पार्टनरचा हात असू शकतो, असा पीडितेच्या कुटुंबियांनी दावा केला आहे.